घरदेश-विदेशरुग्णवाहिकेअभावी नवजात बालकाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेवून गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

रुग्णवाहिकेअभावी नवजात बालकाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेवून गाठले जिल्हाधिकारी कार्यालय

Subscribe

डिक्कीतील मृतदेह काढताना पाहून मोठा धक्का बसला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

सिंगरुली – मध्य प्रदेशात आरोग्य विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. जिल्हा रुग्णालयातून गर्भवती महिलेला तपासणीसाठी क्लिनिकमध्ये पाठवण्यात आले. त्याचवेळी प्रसुतीनंतर महिलेने मृत मुलाला जन्म दिला आणि तिला रुग्णवाहिकाही मिळाली नाही. यामुळे महिलेचा पती मंगळवारी आपल्या नवजात मुलाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीमध्ये ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. डिक्कीतील मृतदेह काढताना पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला मोठा धक्का बसला. या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

हेही वाचा – जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये दहशतवादी इम्रान गनी ठार

- Advertisement -

उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यात लराहणारे दिनेश भारती यांनी सांगितलं की, त्यांच्या बायकोची प्रसुती होणार होती. त्यासाठी त्यांना सिंगरौली जिल्ह्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं. प्रसुतीच्या आधी त्यांची काही चाचणी करण्यासाठी त्यांना दुसऱ्या दवाखान्यात पाठवलं. तिथे अल्ट्रा साऊंडमध्ये बाळाचा पोटातच मृत्यू झाल्याचं समजलं. तो अहवाल घेऊन दिनेश भारती यांची पत्नी मीना भारती पुन्हा जिल्हा रुग्णालयात गेले. त्यानंतर, मीना भारती यांची प्रसुती करून पोटातील मृत बाळ बाहेर काढण्यात आलं. पत्नी आणि मृत मुलाला घरी घेऊन जाण्यासाठी दिनेश भारता यांनी रुग्णवाहिका मागितली. पण, रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्यांची मदत केली नाही.

हेही वाचा – बिल्किस बानो प्रकरणातील ‘त्या’ दोषीवर विनयभंगाचाही गुन्हा दाखल

- Advertisement -

नवजात बाळाच्या मृत्यूमुळे दुःखी झालेले दिनेश  भारती रुग्णलायातील असंवेदनशील काराभारामुळे संतापले. त्यांनी याबाबत तक्रार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय गाठलं. जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्यासाठी त्यांनी आपल्या मृत नवजात बाळाचा मृतदेह बाईकच्या डिक्कीत ठेवला. तेथील जिल्हाधिकाऱ्यांना भेटून संपूर्ण हकिगत सांगितली. तसंच, डिक्कीत ठेवलाल मृतदेहही काढून दाखवला. आपल्या नवजात बाळाचा मृतदेह डिक्कीत ठेवलेला पाहून तिथे असलेल्या  प्रत्येकालाच धक्का बसला. अखेर, याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -