घरताज्या घडामोडीCoronaVirus: डोनाल्ड ट्रम्प देखील घेतात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळी!

CoronaVirus: डोनाल्ड ट्रम्प देखील घेतात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळी!

Subscribe

जगातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. जगात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण अमेरिकेत आढळले आहेत. अमेरिकेत १६ लाखांहून अधिक लोकांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला असून ९१ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. याच कोरोनाच्या संकटात भारताने अमेरिकेला मदत केली. भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन या गोळ्यांच्या साठ्यातला काही साठा अमेरिका दिला. दरम्यान कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन प्रभावी असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले. तसंच आपण देखील हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनच्या गोळीचे सेवन करत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे.

मात्र दुसऱ्या बाजूला अमेरिकेच्या सरकारी तज्ज्ञांचे असं मत आहे की, ‘या मलेरियाच्या गोळ्या कोरोनावर मात करू शकत नाही. अशा परिस्थितीत डोनाल्ड ट्रम्प या गोळीचे सेवन करत आहेत. ट्रम्प यांनी या गोळीबाबत अनेक मोठे दावे केले होते आणि भारताकडून या गोळ्यांची मागणी केली होती.

- Advertisement -

ट्रम्प म्हणाले की, ‘त्यांची कोरोना विषाणूची चाचणी नकारात्मक आली आहे आणि आता त्यांच्यात कोणतीही लक्षणे नाहीत. ते दीड आठवड्यापासून खबरदारी म्हणून हायड्रोक्सीक्लोरोक्वीन घेत आहेत.’

आंतरराष्ट्रीय स्तरावरील ncov2019.live या अधिकृत वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेतील कोरोनाबाधितांचा आकडा १५ लाख ५० हजार २९४वर पोहोचला आहे. तर मृतांचा आकडा ९१ हजार ९८१ झाला आहे. तसंच आतापर्यंत ३ लाख ५६ हजार ३८३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनानंतर भारतात ‘या’ आजाराची दहशत; ८ वर्षांच्या मुलामध्ये आढळली लक्षणं!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -