घरताज्या घडामोडीकरदात्यांना दिलासा; इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

करदात्यांना दिलासा; इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी ३० नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ

Subscribe

मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकजेची घोषणा केली. त्यामुळे आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली.

कोरोना संकटात केंद्र सरकारने करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. सरकारने इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठीची मुदत वाढविली आहे. करदात्यांना आता ३० नोव्हेंबरपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न्स भरता येणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मार्च २०२१ पर्यंत टीडीएस-टीसीएसच्या दरात २५ टक्के कपात केली आहे. इन्कम टॅक्स रिटर्न्स भरण्याची तारीख ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत वाढविण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या पॅकजेची घोषणा मंगळवारी केली. त्यामुळे आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पॅकेजविषयी सविस्तर माहिती दिली. नॉन सॅलरीड लोकांसह अन्य करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. यामुळे आता ५० हजार कोटी रुपयांचा फायदा होणार असल्याचे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.

- Advertisement -

एमएसएमई क्षेत्रांसाठी (सूक्ष्म, मध्यम आणि लघू उद्योग) ३ लाख कोटींपर्यंतची विना गॅरंटी कर्ज योजना अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी जाहीर केली आहे. ज्यांची २५ कोटींची कर्ज रक्कम शिल्लक आहे आणि १०० कोटींची उलाढाल आहे, त्यांना याचा फायदा होईल. यामध्ये कुणालाही कोणतंही तारण द्यावं लागणार नाही. पहिल्या वर्षात मुद्दल वसूल केली जाणार नाही. ४ वर्षांसाठी हे कर्ज दिले जाईल. ३१ ऑक्टोबर २०२० पर्यंत ही योजना उपलब्ध असेल. त्याचा ४५ लाख अडचणीत नसलेल्या पण सामान्य सूक्ष्म, मध्यम आणि लघु कुटीरोद्योग, घरगुती उद्योगधंद्यांना फायदा होईल. जेणेकरून ते त्यांचा उद्योग जिवंत ठेऊ शकतील, अशी अपेक्षा निर्मला सीतारामण यांनी व्यक्त केली.

- Advertisement -

हेही वाचा – धक्कादायक: नवरा विसरा लग्नाचा वाढदिवस म्हणून तिने उचलले टोकाचे पाऊल!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -