Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कर्नाटक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवरून केला प्रवास

कर्नाटक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटरवरून केला प्रवास

Subscribe

कर्नाटकातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचा जोरदार प्रचार सुरू आहे. १० मे रोजी कर्नाटकात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राहुल आणि प्रियंका गांधी आज ७ सभा घेतल्या आहेत

बंगळुरू | कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात येऊ पोहोचला आहे. या निवडणुकीच्या प्रचारात सर्व पक्ष आपली ताकद पणाला लावत आहेच. यावेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी देखील प्रचारासाठी कर्नाटकात आहेत. राहुल गांधींनी आज बंगळुरूमध्ये चक्क डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालवण्याचा आनंद घेतला. यावेली राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉयसोबत सुमारे २ किलोमीटर स्कूटरने प्रवास केला.

बंगळुरूमध्ये राहुल गांधी जाहीर सभा पार पडल्यानंतर राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉयसोबत स्कूटर चालविण्याचा आनंद घेतला. हा व्हिडीओसध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावेळी राहुल गांधींनी डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरमागे बसले असून त्यांनी हेल्मेट घातला दिस आहे. राहुल गांधींनी आणेकल येथील सभा ४ वाजता आणि दुसरी पुलकेशीनगर येथील ६ वाजता, अशा दोन सभा पार पडल्या. या व्यतिरिक्त आज रात्री ८.३० वाजता राहुल गांधींची रॅली होणार आहे.  कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी-शाहांनी केला रोड शो

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक रोड शो केला, यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या संख्येने जनसमुदायने गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. पंतप्रधानांनी सलग दुसऱ्या दिवसी रोड शो झाला. यात आज पंतप्रधानांचा रोड शो न्यू टिपसंद्र रोडवरील केम्पेगौडा पुतळ्यापासून सुरू झाला आणि ट्रिनिटी सर्कलमध्य संपला होता. पंतप्रधानांचा आजाच रोड शो हा १० किलोमीटरचा होता.

अमित शाहांचा देखील रोड शो

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांचा देखील आज बेळगावी दक्षिण मतदारसंघात रोड शो झाला. यावेळी मोठ्या संख्येने भाजप कर्यकर्ते आणि समर्थक रोड शोमध्ये सहभागी झाल्याचे दिसून आले. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी १० मे रोजी मतदान होणार आहे तर, १३ मे रोजी मतमोजणी होणाक आहे.

 

- Advertisment -