घरताज्या घडामोडीएलॉन मस्क येताच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचा ताप वाढला; दरदिवशी करताहेत 12 तास काम

एलॉन मस्क येताच ट्विटरच्या कर्मचाऱ्यांचा ताप वाढला; दरदिवशी करताहेत 12 तास काम

Subscribe

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एलॉन मस्क यांनी आतारपर्यंत घेतलेल्या निर्णयांमुळे एकिकडे त्यांच्यावर टीकाही होत आहे.

टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी ट्विटरची मालकी आपल्याकडे घेतल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. एलॉन मस्क यांनी आतारपर्यंत घेतलेल्या निर्णयांमुळे एकिकडे त्यांच्यावर टीकाही होत आहे. तसेच, दुसरीकडे युजर्सपेक्षा ट्विटरचे कर्मचारीच जास्त नाराज असल्याचे समजते. त्याचकारण म्हणजे अनेक ट्विटरच्या अभियंत्यांना दिवसाचे 12 तास आणि आठवड्यातून 7 दिवस काम करण्यास सांगितले जात आहे. (elon musk new rule for twitter employees work or loose job)

एलॉन मस्क यांनी केलेल्या बदलांनुसार कामाची डेडलाईन पुर्ण करण्यासाठी अधिक कामे करावी लागणार असल्याचे ट्विटरच्या मॅनेजरने कर्मचाऱ्यांना सांगितले. त्यानुसार, मस्कची डेडलाइन पूर्ण करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 12 तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. तसेच त्यांना आठवड्यातून 7 दिवस काम करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कर्मचारी अतिरिक्त कामाच्या तासांसाठी वेतन, कॉम्प्रेशन किंवा जॉब सिक्युरिटी यावर बोलणी करू शकत नाहीत. कारण अभियंत्यांना काम पुर्ण करण्यासाठी मुदत देण्यात आली आहे. शिवाय, काम पूर्ण न झाल्यास त्यांची नोकरी जाऊ शकते. तसेच, काम पूर्ण न झाल्यास मस्कने 50 टक्के कर्मचारी कपातीची धमकी दिल्याचा दावाही करण्यात आला आहे.

कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम

- Advertisement -

ट्विटरच्या व्यवस्थापकाने कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त वेळ काम करण्यास सांगितले आहे. तसेच, ट्विटर आता ब्लू टिकसाठी प्रत्येक युजर्सकडून 8 डॉलर म्हणजेच 660 रुपये प्रति महिना शुल्क आकारणार आहे. ही सुविधा सुरू करण्याची तयारी जोरात सुरू असून या कामासाठी येथील अभियंत्यांना अतिरिक्त काम करण्यास सांगितले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीला म्हणजे 07 नोव्हेंबरपर्यंत ब्लू टिक पेड फीचर लाँच करण्याची शक्यता आहे.


हेही वाचा – ट्विटरच्या ‘Blue Tick’साठी प्रत्येक देशात असतील वेगवेगळे दर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -