घरताज्या घडामोडीNetflix वरील मनोरंजन आता ६० टक्के स्वस्त, नवीन दर वाचा

Netflix वरील मनोरंजन आता ६० टक्के स्वस्त, नवीन दर वाचा

Subscribe

हल्ली डिजीटल युगात तरुणाई ही मनोरंजनासाठी मोठ्या प्रमाणात ओटीटी प्लॅटफॉर्मवर वळली आहे.ऑनलाइन व्हिडिओ स्ट्रीमिंग गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढले आहे. कोरोना महामारीच्या काळात Netflix, Amazon Prime Video, Disney Hotstar आणि G5 सारख्या OTT प्लॅटफॉर्मचे वापरकर्ते झपाट्याने वाढले आहेत. व्हिडिओ कंटेट स्ट्रीमिंग प्लेटफॉर्म नेटफ्लिक्स वर मूव्ही पाहणे आणि आपल्या आवडत्या वेबसीरीज पाहणे आता खिशाला परवडणारे होणार आहे. नेटफ्लिक्सने मासिक सबस्क्रिप्शन आता ६० टक्क्यांनी स्वस्त झाले आहे. देशात ओटीटी प्लॅटफॉर्मच्या वाढत्या स्पर्धेमध्ये प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी नेटफ्लिक्सने एक निर्णय घेतला आहे. नवे दर आज १४ डिसेंबरपासून लागू करण्यात येत आहेत. आता नेटफ्लिक्सच्या महिन्याच्या सब्सस्क्रिप्शनसाठी १४९ रुपये मोजावे लागणार आहेत. पहिले याच सब्सक्रिप्शनचे १९९ मोजावे लागत होते. याशिवाय मासिक बेसिक प्लॅन ४९९ च्या ऐवजी १९९ रुपयांना मिळणार आहे.

पाहा नेटफ्लिक्सचे जुने आणि नवे दर

आता नेटफ्लिक्सच्या महिन्याच्या सब्सक्रिप्शनसाठी १४९ मोजावे लागणार ज्याचे पहिले १९९ रुपये मोजावे लागत होते.
प्रत्येक महिन्याचा बेसिक प्लॅन हा आता १९९ रुपयांना मिळणार असून, याआधी या प्लॅनची किंमत ४९९ रुपये इतकी होती.स्टॅंटर्ड प्लॅनसाठी प्रत्येक महिन्याला ४९९ रुपये आणि प्रीमियम प्लॅनसाठी ६४९ रुपये मोजावे लागणार आहेत.याआधी स्टॅंडर्ड प्लॅनसाठी ६४९ रुपये आणि प्रीमियम प्लॅनसाठी ७९९ रुपये द्यावे लागत होते.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉन ने वाढवली मेंबरशिप फी

अ‍ॅमेझॉनने नुकतेच आपल्या प्राइम प्रोग्रामचे वार्षिक सबस्क्रिप्शन महाग होण्याची घोषणा केली होती. अ‍ॅमेझॉनने हे सबस्क्रिप्शन ५० टक्क्यांनी महाग केले असून, १४९९ रुपये केले आहे. वार्षिक मेंबरशिप व्यतिरिक्त, अ‍ॅमेझॉन
ने मासिक आणि त्रैमासिक सदस्यत्व शुल्कात वाढ केली आहे. Disney + Hotstar ची वार्षिक सदस्यता ८९९ रुपयांपासून सुरू होते.


हे ही वाचा – Sindhudurg: दुबईतून गोवा मार्गे सिंधुदुर्गात आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -