घरताज्या घडामोडीमहिलेने अंगावरील साडी काढून रोखला रेल्वे अपघात! नेमकं सत्य काय? जाणून घ्या

महिलेने अंगावरील साडी काढून रोखला रेल्वे अपघात! नेमकं सत्य काय? जाणून घ्या

Subscribe

आपण अनेक धाडसी महिलाची कथा ऐकली आहे. अशाच एका उत्तर प्रदेशमधल्या धाडसी महिलेबद्दल चांगलीच चर्चा सुरू आहे. या ७० वर्षीय वुद्ध महिलेने आपल्या अंगावरील लाल रंगाची साडी काढून ती लाकडांना बांधून रेल्वे अपघात रोखल्या म्हटले जात आहे. उत्तर प्रदेशमध्ये एटामधील घटना आहे. रेल्वे रुळ तुटल्यामुळे या महिलेने आजूबाजूच्या शेतातील लोकांच्या मदतीने रेल्वे चालकाला इशारा दिला. हा इशारा समजताच चालकाने रेल्वे रोखली. त्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आली. काही वेळात रेल्वे कर्मचारी तिथे पोहोचले आणि तुटलेल्या रुळ दुरुस्त केला. यादरम्यान जवळपास अर्धा तास एका ठिकाणी रेल्वे थांबली होती.

याबाबत पोलीस कर्मचारी कौशिक यांनी ट्विट करून लिहिले की, ‘श्रीमती ओमवती. सकाळी शेतात काम करण्यासाठी जात होती. रेल्वे रुळ ओलांडताना तिला तुटलेला रुळ दिसला. काही वेळात रेल्वे येणार होती, त्यामुळे आपली लाल रंगाची साडी लाकडांना बांधून ती रेल्वे रुळावर दाखवली. यामुळे धावती रेल्वे थांबली. रुळ दुरुस्त केले, तेव्हा ३० मिनिटांनंतर रेल्वे रवाना झाली.’

- Advertisement -

यावर अजय मौर्य नावाच्या युझरने लिहिले की, ‘या मातेचा सन्मान केला पाहिजे.’ तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘शेवटी आई सर्वांची काळजी घेतेच.’ तर तिसऱ्या युझरने लिहिले की, ‘एक खरी हिरो.’

- Advertisement -

परंतु या घटनेत कितपत सत्य आहे, हे स्पष्ट नाही. काही अधिकारी रुळ तुटले नसून दुरुस्ती चालू होती, असे सांगत आहेत. हिंदुस्तानच्या वृत्तानुसार, जलेसर सिटी रेल्वे स्टेशन अधीक्षक एसएस मीना म्हणाल्या की, ‘मागील सहा महिन्यांपासून एटा-बरहन रेल्वे येथे रुळ बदलण्याचे काम सुरू आहे. सध्या कुसवा रेल्वे स्टेशन जवळ रुळ बदलण्याचे काम सुरू आहे. यामुळे दररोज सकाळी सव्वा नऊ वाजल्यापासून दुपारी सव्वा बारा वाजेपर्यंत रेल्वे लाईन ब्लॉक असते. म्हणून कदाचित येथे काम राहिले असावे, यामुळे रुळ जोडले नव्हते. त्यामुळे या घटनेचा तपास सुरू आहे.’

आजतक या वृत्तसंस्थेच्या बातचित करताना रेल्वेकडून सांगण्यात आले की, ‘मेंटेनेंस करणाऱ्या कीमॅनने रेल्वे रोखली, हे सत्य आहे. तो पाहणीकरण्यासाठी सकाळी-सकाळी बाहेर पडला होता. त्यावेळेस त्याने रेल्वे रोखली. महिलेने ही रेल्वे रोखली यात काही तथ्य नाही. हे खोटे वृत्त आहे. माझी इन्स्पेक्टरसोबत बातचीत झाली आहे, त्यामुळे मला खरे सत्य समजले आहे.’


हेही वाचा – Rimi Sen Files FIR : अभिनेत्री रिमी सेनची कोट्यवधींची फसवणूक; खार पोलिसांत गुन्हा दाखल


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -