घरदेश-विदेशGujarat Election : मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपाचा वरचष्मा, 'या' १० मतदारसंघात आघाडीवर

Gujarat Election : मुस्लिमबहुल मतदारसंघातही भाजपाचा वरचष्मा, ‘या’ १० मतदारसंघात आघाडीवर

Subscribe

Gujarat Election Result | गुजरातमध्ये ९ ते १० टक्के मुस्लीम मतदार आहेत. ३० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या १५ टक्के आहे. तर, ३० पैकी २० मतदारसंघात २० टक्के मुस्लिम मतदार आहेत.

Gujarat Election Result | अहमदाबाद – गुजरात विधानसभा निवडणुकांचे निकाल भाजपाच्या बाजूने असल्याचं स्पष्ट होत आहे. भाजपाच्या विजयाची अधिकृत घोषणा होणे बाकी राहिले आहे. आतापर्यंत भाजपा १५६ जागेवर आघाडीवर आहे. हिंदूत्त्वाच्या मुद्द्यांवरून निवडणूक लढवणाऱ्या भाजपाला गुजरातमध्ये मुस्लिमबहुल मतदारसंघातही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. १० पैकी ९ मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपाचा वरचष्मा असल्याचं स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा – Gujarat Election 2022 : निवडणुकीच्या प्रचारात सहभागी न केल्याची शशी थरूरांना खंत

- Advertisement -

दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये आपला मोर्चा वळवला होता. आपमुळे गुजरातमध्ये तिहेरी लढत झाली. असद्दुदीन ओवैसीच्या AIMIM पक्षानेही गुजरातमध्ये जोर लावला होता. गुजरातमध्ये ९ ते १० टक्के मुस्लीम मतदार आहेत. ३० पेक्षा अधिक विधानसभा मतदारसंघात मुस्लिम मतदारांची संख्या १५ टक्के आहे. तर, ३० पैकी २० मतदारसंघात २० टक्के मुस्लिम मतदार आहेत.

हेही वाचा पोकळ आश्वासन देणाऱ्यांना गुजरातने नाकारले, विजयाच्या घोषणेआधीच अमित शाहांकडूनही जल्लोष

- Advertisement -

सर्वाधिक मुस्लिम मतदार असलेल्या १० जागांवर कोणाची सत्ता आली हे आपण जाणून घेऊयात. तसंच, गुजरातमधील मुस्लिम समजाचा कोणत्या पक्षावर विश्वास आहे हेसुद्धा यातून सिद्ध होऊ शकेल.

जागा मुस्लिम मतदारांची टक्केवारी २०१२ मधील विजयी २०१७ मधील विजयी २०२२मधील संभाव्य विजयी पक्ष
जमालपूर खडिया 61 भाजपा काँग्रेस काँग्रेस
दाणिलिमडा 48 काँग्रेस काँग्रेस भाजपा
दरियापूर 46 काँग्रेस काँग्रेस भाजपा
वागरा 44 भाजपा भाजपा भाजपा
भरूच 38 भाजपा भाजपा भाजपा
वेजलपूर 35 भाजपा भाजपा भाजपा
भुज 35 भाजपा भाजपा भाजपा
जंबुसर 31 भाजपा काँग्रेस भाजपा
बापूनगर 28 भाजपा काँग्रेस भाजपा
लिंबायत 26 भाजपा भाजपा भाजपा

गुजरातमध्ये १० टक्के मुस्लिम समाज आहे. यानुसार, एकूण जागांच्या तुलनेत गुजरातमध्ये १८ मुस्लिम आमदार असणे गरजेचे होते. परंतु, गुजरातमध्ये केवळ सात टक्के मुस्लिम समाजाचे आमदार आहेत. २०१७ मध्ये काँग्रेसचे तीन मुस्लिम उमेदवार विजयी ठरले होते. तर, २०१२ मध्ये फक्त दोनच मुस्लिम उमेदवार जिंकून आले होते.

काँग्रेसने यंदा सहा मुस्लिम उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले होते. सुरत पूर्व मतदारसंघात असलम सायकलवाला, वांकानेरमधून मोहम्मद जावेद पीरजादा, अबडासमधून ममदभाई जुंग जत, वागरातून सुलेमान पटेल, दरियापूरमधून ग्यासुद्दीन शेख, जमालपूर खडियामधून इमरान खेडावा यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, आपने तीन मुस्लिम चेहरे उभे केले होते. दरियापूरमधून ताज कुरैशी, जंबसूरमधून साजिद रेहान आणि जमालपूर खेडिया येथून हारून नागोरी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, भाजपाने एकाही मुस्लिम उमेदवाराला तिकिट दिले नव्हते.

भूज आणि भरुच जिल्ह्यांत २० टक्के मुस्लिम समाज आहे. अहमदाबाद येथे वेजलपूर, दरियापूर, जमालपूर खाडिया आणि दानीलिमडासारख्या मतदारसंघात मुस्लिम मतदार निर्णायक भूमिका घेतात. संपूर्ण गुजरातमध्ये २० मतदारसंघ असे आहेत, जिथे मुस्लिमांची टक्केवारी २० टक्क्यांहून अधिक आहे. जमलापूर खडिया मतदारसंघात ५० टक्क्यांहून अधिक मतदार मुस्लिम समाजातील आहेत. त्याशिवाय, दाणिलिमडामध्ये ४८ टक्के, दरियापूरमध्ये ४६ टक्के, वागरा येथे ४४ टक्के, भरूच येथे ३८ टक्के, वेजलपूरमध्ये ३५ टक्के, भूजमध्ये ३५ टक्के, जंबुसरमध्ये ३१ टक्के, बापूनगरमध्ये २८ टक्के आणि लिंबायतमध्ये २६ टक्के मुस्लिम मतदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -