घरठाणेकैद्यांसाठी ठाण्यात पहिले क्वारंटाईन सेंटर

कैद्यांसाठी ठाण्यात पहिले क्वारंटाईन सेंटर

Subscribe

विटावा शाळेत उभारले सेंटर; तिथेच कैद्यांच्या सर्व चाचण्या होणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि कारागृहातील कैद्यांना कोरोनाची लागण होण्याच्या प्रमाणात लक्षणीय वाढ पाहता ठाणे कारागृहातील कैद्यांसाठी विटावा शाळेत लवकरच एक क्वारंटाईन सेंटर सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारे कैद्यांसाठी सुरू होणारे ठाण्यातील पहिलेच क्वारंटाईन सेंटर आहे. या क्वारंटाईन सेंटरमध्ये कैद्यांच्या सर्व चाचण्या होणार आहेत, त्यात आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचण्यांचा समावेश आहे. चौदा दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवल्यांनतर निगेटिव्ह येणार्‍या कैद्यांना पुन्हा कारागृहात हलविले जाणार आहे.

राज्यातील प्रमुख कारागृहापैकी ठाणे कारागृह हे अत्यंत महत्त्वाचे कारागृह मानले जाते. किरकोळ ते गंभीर गुन्ह्यांत न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना याच कारागृहात ठेवले जाते. काही दिवसांपासून कोरोनाचा कहर वाढत असल्याने कोरोनाने काही कारागृहात प्रवेश केला आहे. गतवर्षी ठाणे कारागृहातील 70 हून अधिक आरोपींना कोरोनाची लागण झाली होती. हीच परिस्थिती इतर कारागृहात आहे. त्याची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेत ठाणे कारागृहाजवळील महापालिकेच्या विटावा शाळेत कैद्यांसाठी क्वारंटाईन सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. कारागृहातील इतर कैद्यांना कोरोनाची लागण होऊ नये म्हणून खबरदारी म्हणून काही कैद्यांना या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे.

- Advertisement -

अनेकदा पोलीस आरोपींना अटक केल्यानंतर त्यांची अँटीजेन चाचणी करुन त्यांना कोर्टात हजर करतात, पोलीस आणि न्यायालयीन कोठडीत असताना अनेक आरोपींना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले होते. हा कोरोना न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपीकडून इतर कैद्यांना पसरु नये म्हणून ठाणे कारागृहात हा उपक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कारागृहात असलेल्या सर्व कैद्यांना नियमित आरटीपीसीआर आणि अँटीजेन चाचणी होणार आहे, काही कैद्यांना कोरोनाचे लक्षणे दिसल्यास त्यांना विटावा शाळेत सुरू होणार्‍या क्वारंटाईन सेंटरमध्ये ठेवले जाणार आहे. चौदा दिवस त्याच्यावर तिथेच उपचार केले जाणार आहेत. त्याचा रिपोर्ट नेगीटिव्ह आल्यानंतर त्याला पुन्हा कारागृहात पाठविले जाणार आहे. दिवसातून दोन ते तीन वेळा कैद्यांची ऑक्सिजन लेव्ह आणि तापमान मोजले जाईल.

सध्या ठाणे कारागृहात साडेतीन हजारांहून अधिक कैदी असून त्यातील सत्तर कैद्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. दुसरीकडे कोरोनापासून स्वतःचा आणि इतरांचा बचाव करण्यासाठी काही कैदीच आपल्या सहकार्‍यांचे समुपदेशकाची भूमिका पार पाडत आहेत. कैद्यांना मानसिक आधार देताना कोरोना होणार नाही यासाठी त्यांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे. त्यासाठी जेल प्रशासनाने सर्वच कैद्यांना जेलमध्ये सकस आहारासोबत हळद-मिरे टाकलेले दूध देण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात आले, जेणेकरुन कैद्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. काही कारागृहात अशा प्रकारे क्वारंटाईन सुरू झाले असले तरी ठाण्यात सुरू होणारे हे पहिलेच क्वारंटाईन सेंटर आहे. त्याचा कारागृहातील कैद्यांना नक्की फायदा होईल, असे जेल प्रशासनाकडून सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -