घरदेश-विदेशडबल इंजिन सरकारमुळे विकासाचा वेग दुप्पट असल्याचा अनुभव; मोदींचा दावा

डबल इंजिन सरकारमुळे विकासाचा वेग दुप्पट असल्याचा अनुभव; मोदींचा दावा

Subscribe

नवी दिल्ली : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी (Karnataka Assembly Elections) दोन आठवडे उरले असताना राज्याची सत्ता मिळविण्यासाठी सर्वच पक्ष आपली दावेदारी सिद्ध करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) डिजिटल माध्यमांतून कर्नाटकातील भाजपाच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी डबल इंजिन सरकार विकासाचा दुप्पट वेग असल्याचा नऊ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे जनतेमध्ये डबल इंजिन सरकारचे फायदे सांगण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन त्यांनी केले आहे.

आगामी कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या लाखो कार्यकर्त्यांना डिजिटल माध्यमातून संबोधित करताना मोदींनी पक्षाच्या बूथ-स्तरीय प्रचाराला बळकटी देण्याचे आवाहन केले आहे. यावेळी देशातील आव्हानांना तोंड देण्यासाठी केंद्र सरकारकडून देशातील गरीब कुटुंबांना शक्य ती सर्व मदत केली जात असल्याचे मोदींनी सांगितले. त्यांनी मोफत अँटी-कोविड लसीकरण आणि मोफत धान्य योजनांचाही उल्लेख करताना म्हणाले की, जीव वाचवण्यासाठी आणि देशाला पुढे नेण्यासाठी सरकार आवश्यक पावले उचलत आहेत. त्यामुळे ‘डबल इंजिन’ सरकारचे काय फायदे जनतेमध्ये जाऊन सांगण्याचे आवाहन मोदींनी कार्यकर्त्यांना केले आहे. अलीकडच्या काळात विधानसभा निवडणुकीत भाजपाने ‘डबल इंजिन’ हा मुद्दा मोठा बनवला आहे. दुहेरी इंजिन सरकारचा अर्थ म्हणजे विकासाचा दुप्पट वेग. त्यामुळे गेल्या नऊ वर्षांचा अनुभव आहे की, जिथे जिथे भाजपचे दुहेरी इंजिन सरकार आहे, तिथे गरिबांच्या हिताच्या योजना वेगाने राबवल्या जात असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

जगभरातील गुंतवणूकदारांसाठी भारत महत्त्वाचे केंद्र
गेल्या नऊ वर्षांत भारत जगभरातील गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास आला आहे. कारण केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्यामुळे कर्नाटकला खूप फायदा झाला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत असे सरकार आले, जे केंद्र सरकारशी प्रत्येक मुद्यावर संघर्ष करेल, योजना थांबवत राहील, पायाभूत सुविधांशी संबंधित सर्व प्रकल्प रखडवत राहतील, रस्ते बांधायचे असतील तर जमिनीची कामे हळूहळू करेल तर मग गुंतवणूक कशी येणार? गुंतवणूक आली नाही तर कर्नाटकमध्ये नवीन रोजगार कसे निर्माण होणार? त्यामुळे डबल इंजिन सरकार नसेल तर जनतेला समस्यांचा सामना करावा लागतो.

विधानसभा निवडणुकीसाठी पंतप्रधानांची ‘डिजिटल रॅली’
कर्नाटकमध्ये 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराला बळ देण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांना पंतप्रधानांनी संबोधन केले आहे. भाजपाने या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, पंतप्रधानांच्या ‘डिजिटल रॅली’मध्ये 58, 112 बूथमधील सुमारे 50 लाख कार्यकर्ते सहभागी होतील. पक्षाचा प्रचार आणखी मजबूत करण्यासाठी मोदी शनिवारपासून दोन दिवसीय कर्नाटक दौऱ्यावर येणार आहेत. यादरम्यान त्यांचा सहा जाहीर सभांना संबोधित करण्याचा आणि दोन रोड शो करण्याचा कार्यक्रम आहे.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -