घरदेश-विदेशभारत जोडो यात्रेसाठी भाजी विक्रेत्याकडून वसुली, काँग्रेस कार्यकर्त्यांची 2000 रुपयांसाठी धमकी

भारत जोडो यात्रेसाठी भाजी विक्रेत्याकडून वसुली, काँग्रेस कार्यकर्त्यांची 2000 रुपयांसाठी धमकी

Subscribe

भाजी विक्रेत्याने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी पैसे दिले नाहीत तेव्हा त्याच्यावर केवळ मारहाणच झाली नाही तर त्याच्या दुकानाची तोडफोड सुद्धा करण्यात आली.

केरळमधील(kerala) कोल्लम शहरामध्ये काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलेले कृत्य सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. कोंग्रेसच्या या सगळ्या कार्यकर्त्यांवर भाजीपाला विक्रेत्यांकडून खंडणी उकळल्याचा आरोप आहे. या सगळ्या प्रकरणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपने या प्रकरणावरुन काँग्रेसवर(congress) जोरदार हल्ला चढवला आहे. काँग्रेसच्या विरोधात बोलण्यासाठी भाजपच्या(bjp) हातात आयते कोलीत सापडले.

हे ही वाचा – Congress MLA : काँग्रेसच्या नाराज आमदारांचं सोनिया गांधींना पत्र, सोनिया गांधींची घेणार भेट

- Advertisement -

कोल्लममधून आलेल्या वृत्तानुसार, असा दावा करण्यात आला आहे की, जेव्हा एका भाजी विक्रेत्याने काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी(bharat jodo yatra) पैसे दिले नाहीत तेव्हा त्याच्यावर केवळ मारहाणच झाली नाही तर त्याच्या दुकानाची तोडफोड सुद्धा करण्यात आली. इतकेच नाही तर राहुल गांधी(rahul gandhi) यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रेच्या खर्चासाठी दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचा गंभीर आरोप भाजी विक्रेत्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर केला.

- Advertisement -

हे ही वाचा –  काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला 7 सप्टेंबरपासून सुरुवात

भाजीचे दुकान चालवणाऱ्या एस फवाज यांनी कुन्नीकोड ​​पोलिस ठाण्यात या संदर्भांत तक्रार दाखल केली आहे. त्याच्या दुकानात पोहोचलेल्या काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचा आरोप पीडित भाजी विक्रेत्याताने पोलिसांकडे दाखगल केलेल्या तक्रारीत केला आहे. युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अनिश खान यांचाही मारहाण, धमकावणे आणि शिवीगाळ करणाऱ्यांमध्ये समावेश असल्याचे समोर आले आहे.

हे ही वाचा – ’56 इंच’ थाळी, साडे आठ लाखांचं बक्षीस; मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीतील हॉटेल मालकाची आगळीवेगळी भेट

काँग्रेस कार्यकर्त्यांनी दुकानात काम करणाऱ्या मुलांना मारहाण करून भाजीपाला खाली फेकल्याचा आरोपही आहे. पीडित भाजी विक्रेत्याने सांगितले की, ‘काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांनी 2000 रुपयांची मागणी केली होती, पण मी फक्त 500 देऊ शकलो. त्यामुळे त्यांनी आधी मला मारहाण केली आणि नंतर माझ्या दुकानाची तोडफोड करून नुकसान केले. गर्दी वाढत असल्याचे पाहून आरोपी जीवे मारण्याची धमकी देत ​​तेथून निघून गेले’. असंही भाजी विक्रेत्याने सांगितले.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -