घरताज्या घडामोडीAfghanistan: अमेरिकन विमानातून पडलेल्या दोघा भावांपैकी एकाचे हात पाय गायब, तर दुसरा...

Afghanistan: अमेरिकन विमानातून पडलेल्या दोघा भावांपैकी एकाचे हात पाय गायब, तर दुसरा भाऊ बेपत्ता

Subscribe

अफगाणिस्तानमध्ये तालिबानची आता दहशत पसरली आहे. त्यामुळे अफगानी लोकं मिळेल त्या मार्गाने दुसऱ्या देशात पळून जात आहेत. जीवाची परवा न करता विमानाच्या बाहेर, टायरवर बसून लोकं प्रवास करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशाप्रकार एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये विमानातून तीन लोकं पडताना दिसत होते. यातील तीन जणांमधले दोन जण भाऊ होते. या दोघांची ओळख आता पटली आहे. या दोघा भावापैकी एकाच मृतदेह आढळला असून दुसऱ्याचा मृतदेह अजूनही बेपत्ता आहे. यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्यांनी या क्षणांची वेदनादायी कहाणी सांगितली आहे.

माहितीनुसार, विमानातून खाली पडलेल्या तरुण अवघ्या १७ वर्षांचा आहे. या तरुणाच्या एका नातेवाईकाने सांगितले की, ‘त्याचे हात आणि पाय गायब झाले होते. मी स्वतः त्याचा मृतदेह घेऊन आलो. सोमवारी सी-१७ विमानातून लोकांना पडलेले पाहिलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांचे अवशेष शोधून त्यांना काबुलच्या मुख्य विमानतळावरून काढले होते.’

- Advertisement -

द सनच्या वृत्तानुसार, त्या तरुणाच्या नातेवाईकाने सांगितले केली, ‘जेव्हा त्यांनी तरुणाच्या मोबाईलवर फोन केला तेव्हा काहीतरी गडबड झाल्याचे वाटले. कारण एका अनोळखीने फोन उचलला होता. त्यानंतर चिंतित कुटुंबिय १७ वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय त्याच्या भावाला शोधण्यासाठी विमानतळावर पोहोचले. तालिबानीपासून वाचण्यासाठी दोन्ही भाऊ इतके हतबल होते की, त्या दोघांनी सुरक्षितपणे दुसऱ्या देशात जाण्यासाठी विमानतळावर पोहोचले होते.’

कुटुंबियांनी सांगितले की, ‘आम्ही दोन्ही मुलं गमावली असल्यामुळे आम्ही खूप दुःखी आहोत. आम्हा एकाचा मृतदेह मिळाला आहे. परंतु दुसऱ्याचा अजून मृतदेह गायब आहे. नातेवाईकांनी बेपत्ता असलेल्या मुलाचा मृतदेह शोधण्यासाठी अनेक हॉस्पिटलच्या चक्करा मारल्या. पण अजूनही त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही आहे. एका मुलाचा मृत्यू झाल्यामुळे आणि दुसऱ्या मुलगा बेपत्ता असल्यामुळे आई खूप अस्वस्थ आहे. २० हजार शरणार्थिंना कॅनडा आणि अमेरिकेला स्थलांतरित करण्याच्या अफवा ऐकल्यानंतर हे दोघे आपल्यासोबत आयडी कार्ड घेऊन एअरपोर्टला पोहोचले होते आणि त्यानंतर ते सी-१७ कार्गो विमानाच्या चाकातून प्रवास करत होते. त्याचवेळेस ते विमानातून खाली पडले.’

- Advertisement -

हेही वाचा – Kabul Airport: अमेरिकन सी-१७ विमानाच्या चाकांवर आढळले मानवी अवयवाचे तुकडे


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -