Thursday, February 25, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Farmer Protest : दिल्लीत शेतकरी आंदोलकांचा आज 'रेल रोको'चा पवित्रा

Farmer Protest : दिल्लीत शेतकरी आंदोलकांचा आज ‘रेल रोको’चा पवित्रा

आंदोलन शांततेत करणार असल्याचे शेतकरी नेते राकेश टिकेतांचे आश्वासन

Related Story

- Advertisement -

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्याविरोधात आंदोलक शेतकऱ्यांनी आज रेल रोको आंदोलन पुकारले आहे. शेतकरी नेते राकेश टिकेत यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोनल होणार आहे. दुपारी १२ पासून ते दुपारी ३-४ पर्यंत हे आंदोलन सुरु राहणार आहे. हे आंदोलन शांततेत पार पडणार असल्याचे आश्वासन राकेश टिकेत यांनी दिले आहे. याच रेल रोको आंदोनलाच्या पार्श्वभूमीवर गाझीपुर बॉर्डरवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  राकेश टिकेत यांनी ट्विटरच्या माध्यामातून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

या आंदोलनाविषयी बोलताना टिकेत म्हणाले की, ट्रेन सुरुच कुठे आहेत? एक दोन ट्रेन सुरु आहेत. त्यामुळे सरकारला आम्ही अधिक ट्रेन सुरु करण्याचे आवाहन करणार आहोत. रेल्वे बंद असल्याने जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. कारण सरकारने गेल्या आठ महिन्यांपासून रेल्वे बंद ठेवल्या आहेत. त्यामुळे ज्या रेल्वे येतील त्यातील प्रवाशांना आम्ही पाणी, चने फूल देऊन त्यांच्या समस्या जाणून घेऊ. आम्ही रोल रोको करणार आहोत म्हणजे असे आम्ही प्रवाशांसोवत दुर्व्यवहार करणार आहोत असे वाटते का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच कोणी दुर्व्यवहार केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यामुळे हे आंदोलन शांतते करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतकरी संघटना या आंदोलनावर ठाम असल्याने दिल्ली पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने हे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. जय किसान आंदोलनाचे राष्ट्रीय संयोजक यांनी सांगितले की ज्यावेळी ट्राफिक कमी होते त्याचवेळी आम्ही दिल्लीच्या रस्त्यावर आंदोलनासाठी उतरले होतो. त्याचप्रकारे ज्यावेळी रेल्वे फेऱ्यांची संख्या कमी असणाऱ्या दुपाऱया वेळी आम्ही आंदोलनाचे आयोजन केले आहे. या आंदोलनातूनही आम्ही केंद्र सरकारवर तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दबाव टाकणार आहोत.

- Advertisement -

 

- Advertisement -