घरदेश-विदेशकुंभमेळ्यात सिलेंडरचा स्फोट

कुंभमेळ्यात सिलेंडरचा स्फोट

Subscribe

पोलीस प्रशासन, एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत. लोकांना घटनास्थळावरुन हटवण्यात आले आहे.

उत्तरप्रदेशच्या प्रयागराज येथे सुरु असलेल्या कुंभमेळ्यात मोठी दुर्घटना होता होता टळली. दिगंबर आखाड्यामध्ये दोन सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीमध्ये तंबू जळून खाक झाला आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग विझवली आहे. असे सांगितले जात आहे की, सिलेंडरमधून गॅस लीकेज होत असल्याने ही घटना घडली आहे. या घटनेत जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

पोलिसांकडून तपास सुरु

दिंगबर आखाड्याला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. प्रशासनाने लोकांना शांतता ठेवण्याचे आव्हान केले आहे. घटनास्थळावर पोलीस प्रशासन, एनडीआरएफची टीम आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी बचावकार्य करत आहेत. लोकांना घटनास्थळावरुन हटवण्यात आले आहे. ज्या सिलेंडरचा स्फोट झाला आहे त्याचा शोध सुरु आहे जेणे करुन आग पसरण्यापासून थांबवता येईल. सिलेंडरचा स्फोट झाल्यानंतर आसपास उपस्थित असलेल्यांची पळापळ झाली. चेंगराचेंगरी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने सर्वांना शांतता राखण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

अग्निशमन दल उशिरा पोहचले

प्रत्यक्षदर्शिने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास १२ वाजता दिगंबर आखाड्यामध्ये प्रसाद वितरणाचे काम सुरु होते. त्यावेळी सिलेंडरमधून गॅस लीकेज होत असल्याने आग लागली आणि सिलेंडरचा स्फोट झाला. दरम्यान, घटनास्थळी उपस्थित असलेल्या साधू-संतांनी सांगितले की, आगीची घटना घडल्यानंतर एका तासानंतर अग्निशमन दलाची टीम घटनास्थळी दाखल झाली. तर काही लोकांनी सांगितले की, साधू-संतांद्वारे जाळण्यात आलेल्या दिव्यामुळे तंबूला आग लागल्याचे देखील बोलले जात आहे.

सर्वात मोठा कुंभमेळा

जगातला सर्वा मोठा धार्मिक आणि अध्यात्मिक मेळा प्रयागराज कुंभ मंगळवार म्हणजेच मकरसंक्रातीपासून सुरु होणार आहे. १५ जानेवारी ते ४ मार्च असा ४९ दिवस हा कुंभमेळा चालणार आहे. या कुंभमेळ्यामध्ये या वर्षी १३ ते १५ कोटी लोकं येण्याची शक्यता आहे. यामध्ये १० लाख परदेशी नागरिक सहभागी होतात. उत्तरप्रदेश सरकार कुंभमेळा २०१९ ला आतापर्यंचा सर्वात भव्य कुंभमेळा असल्याचे सांगत आहेत. स्नान पर्व पाहता प्रयागराजमध्ये १४ जानेवारी ते १६ जानेवारी या दिवसाच्या काळात शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -