घरदेश-विदेशपेट्रोल-डिझेलपासून मिळणार मुक्ती; 'या' दिवशी लाँच होणार भारतातील पहिली फ्लेक्स इंधन कार

पेट्रोल-डिझेलपासून मिळणार मुक्ती; ‘या’ दिवशी लाँच होणार भारतातील पहिली फ्लेक्स इंधन कार

Subscribe

2020 मध्येच सरकारने फ्लेक्स इंधन इंजिनाबाबत आपली योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार भारतात 2022 पर्यंत 10 टक्के इथेनॉल ब्लेंडिग आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे लक्ष्य ठेवले आहे

नवी दिल्ली :  भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींपासून नागरिकांना मुक्ती मिळणार आहे. कारण भारतातील पहिली फ्लेक्स इंधन इंजिन कार लवकरचं लाँच होणार आहे. टोयोटा किर्लोस्कर मोटरद्वारे ही कार तयार केली जात असून 28 सप्टेंबर 2022 रोजी परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कारचे लाँचिंग होणार आहे.

गेल्या वर्षी जूनमध्येच गडकरींनी देशात फ्लेक्स-इंधन वाहने अनिवार्य करण्याचे संकेत दिले होते. तसेच म्हटले होते की, फ्लेक्स-इंधन वाहनांमुळे शेतकऱ्यांना मदत होईल तसेच भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होण्यास मदत होईल. ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया (ACMA) च्या 62 व्या वार्षिक अधिवेशनातील भाषणात गडकरी म्हणाले की, भारतातील 35 टक्के प्रदूषण हे जीवाश्म इंधनावर (fossil fuel) चालणाऱ्या वाहनांमुळे होते. त्यामुळे इथेनॉलसारखे पर्यायी इंधन विकसित केले पाहिजे जे स्वदेशी, किफायतशीर आणि प्रदूषणमुक्त असेल.

- Advertisement -

दरम्यान ऑटोमोबाईल उद्योगाला ब्राझील, कॅनडा आणि अमेरिकेप्रमाणे भारतातही फ्लेक्स इंजिन असलेली वाहने लाँच करण्याचे आवाहन गडकरींनी केले होते. याचवेळी त्यांनी या महिन्याच्या 28 तारखेला दिल्लीत टोयोटाची फ्लेक्स इंजिन कार लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले होते.

2020 मध्येच सरकारने फ्लेक्स इंधन इंजिनाबाबत आपली योजना जाहीर केली होती. या योजनेनुसार भारतात 2022 पर्यंत 10 टक्के इथेनॉल ब्लेंडिग आणि 2030 पर्यंत 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे लक्ष्य ठेवले आहे. यानंतर 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिगचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. या वर्षी मार्चमध्ये परिवहन मंत्र्यांनी ग्रीन हायड्रोजनवर चालणारी टोयोटा मिराई (Toyota Mirai) कार देखील लॉन्च केली होती. ही कार फ्युएल सेल इलेक्ट्रिक व्हेइकल (FCEV) हायड्रोजनवर चालत असून ती पूर्णपणे पर्यावरणपूरक आहे.

- Advertisement -

याशिवाय काही दिवसांपूर्वी लिक्विफाइड नॅचरल गॅसवर (एलएनजी) चालणाऱ्या ट्रकचेही गडकरींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की, फक्त पंधरा दिवसांपूर्वी मी पुण्यात (लिक्विफाइड नॅचरल गॅस) ट्रक लाँच केला. आज मला पुण्यात मर्सिडीजकडून इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी आमंत्रण मिळाले.


SCO शिखर परिषदेच्या मंचावर दिसणार PM मोदी आणि पुतिन यांची मैत्री, जिनपिंग यांच्याशी होणार का चर्चा?


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -