घरताज्या घडामोडीरायपूरमध्ये रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग, ५ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

रायपूरमध्ये रुग्णालयाच्या ICU मध्ये भीषण आग, ५ कोरोना बाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

रायपूरमध्ये एका रुग्णालयाला भीषण आग लागली असून या आगीत पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून आगीच्या घटनांचे सत्र सुरु आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईमधील भांडुपच्या ड्रिम्स मॉलमधील कोविड सेंटरला आग लागल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागपूरच्या कोविड ‘वेल ट्रिट’ रुग्णालयाला आग लागल्याने चार जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमध्ये एका रुग्णालयाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. रुग्णालयाच्या आयसीयू विभागात ही आग लागली असून या घटनेत पाच कोरोनाबाधित रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

छत्तीसगडमधील रायपूरच्या पचेडी नाक्याजवळ राजधानी रुग्णालयामधील आयसीयूत शॉर्ट सर्किट झाले. यामुळे अचानक रुग्णालयाला आग लागली. या रुग्णालयात जवळपास ५० रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्याची घटना कळताच रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करण्यात आले. या घटनेत दगावलेल्या पाच जणांमध्ये एकाचा आगीमुळे मृत्यू झाला आहे. तर चार जणांचा आगीमुळे ऑक्सिजन सप्लाय बंद पडल्याने मृत्यू झाला आहे.


हेही वाचा – महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांची मागणी केंद्राकडून मान्य, रेल्वेतून होणार ऑक्सिजनचा पुरवठा

- Advertisement -

 

Pradnya Ghogalehttps://www.mymahanagar.com/author/pradnya/
पत्रकारितेत ५ वर्ष पूर्ण. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. सामाजिक, आरोग्यविषयक विषयांवर लिहिण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -