लिव्ह-इनमध्ये राहिली गरोदर; प्रियकरानेच काटा काढून जेसीबीने पुरले वडिलांच्याच शेतात

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे.

five months pregnant woman found dead at farm of father in gujarat
लिव्ह-इनमध्ये राहिली गरोदर; प्रियकरानेच काटा काढून जेसीबीने पुरले वडिलांच्याच शेतात

लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या महिलेची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. गुजरातच्या बारडोली येथे महिलेची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह तिच्याच वडिलांच्या शेतात पुरला असल्याचे उघडकीस आले आहे. ही महिला पाच महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली आहे.

नेमके काय घडले?

मिळालेल्या माहितीनुसार; पीडित महिलेने १४ नोव्हेंबर रोजी आपल्या तीन वर्षाच्या मुलाला तिच्या पालकांच्या घरी सोडले. त्यानंतर ती निघून गेली. ती पुन्हा परतलीच नाही. त्यानंतर तिच्या पालकांनी तिचा सर्वत्र शोध घेण्यास सुरुवात केली. पण, ती काही सापडली नाही. त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेत आपली मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.

पालकांनी दिलेल्या माहितीनुसार; पीडित महिला ही गेल्या पाच वर्षांपासून चिराग या तरुणासोबत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये’ राहत होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी चिरागला ताब्यात घेतले आणि त्याची कसून चौकशी केली. त्या चौकशीत त्यांनी पीडितीची चौकशी केल्याची कबुली दिली. ‘मी तिचा गळा आवळून हत्या केली आणि तिचा मृतदेह घरापासून २२ किलोमीटरवर असलेल्या तिच्या वडिलांच्या शेतात पुरल्याचे’, त्यांनी कबुल केले.

तिच्या हत्येचे त्यांनी कारण सांगितले की, दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती. तसेच आरोपी चिरागच्या पहिल्या पत्नीवरही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. पीडित आणि तिच्यात काही महिन्यांपूर्वी भांडण देखील झाले होते. यावरुन पीडितीच्या हत्येत चिरागसह इतर साथीदारही असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हेही वाचा – कोरोनाचा कहर; सरकारकडून कंटेन्मेंट झोनसाठी Guidelines जारी!