घरदेश-विदेशपंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे; मनमोहन सिंग यांचा सल्ला

पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे; मनमोहन सिंग यांचा सल्ला

Subscribe

कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं मनमोहन सिंग म्हणाले.

भारत-चीन हिंसक चकमकीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत पंतप्रधान मोदींनी, “भारतीय सीमेत कोणीही घुसखोरी केलेली नाही,” असं विधान केलं होतं. या विधानावरुन गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर स्पष्टीकरण द्यायची वेळी सुद्धा पंतप्रधान कार्यालयावर आली होती. नेमकं सीमेवर काय झालं या बाबत नेमकी माहिती कोणाला माहिती नाही आहे. या पार्श्वभूमीवर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात पंतप्रधानांनी सुरक्षा, सामरिक मुद्द्यांवर जपून बोललं पाहिजे, असा सल्ला दिला आहे. कुठलाही भ्रामक प्रचार सक्षम नेतृत्वाला पर्याय ठरत नाही, असं देखीन मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी मोदी सरकारला चीनला प्रत्युत्तर देण्याचं आवाहन केलं आहे. लडाख सीमा वादात शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करताना माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की सैनिकांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये. संपूर्ण राष्ट्राला एकत्र येऊन प्रत्युत्तर देण्याची हीच वेळ आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, “१५-१६ जून रोजी भारताच्या २० शूर सैनिकांनी गलवान खोऱ्यात सर्वोच्च बलिदान दिलं. देशाच्या या जवानांनी शेवटच्या श्वासापर्यंत देशाचे रक्षण केलं. या सर्वोच्च बलिदानाबद्दल आम्ही या धैर्यवान सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आभारी आहोत, परंतु त्यांचे बलिदान व्यर्थ जाऊ नये.”

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की “आज आपण इतिहासाच्या नाजूक वळणावर उभे आहोत. आपल्या भावी पिढ्या आपलं मूल्यांकन कसं करतील हे सरकारचे निर्णय आणि सरकारने उचललेल्या पाऊलांवरुन ठरवतील. जे देशाचे नेतृत्व करतात त्यांच्या खांद्यावर कर्तव्य बजावण्याची मोठी जबाबदारी आहे. आपल्या लोकशाहीमध्ये ही जबाबदारी पंतप्रधानांची आहे. पंतप्रधानांनी त्यांच्या शब्दांचा आणि घोषणांचा देशाच्या सुरक्षेवर आणि भूभागीय व ऐहिक हितसंबंधांवर होणाऱ्या परिणामांविषयी नेहमीच सावधगिरी बाळगली पाहिजे. एप्रिलपासून चीनने बर्‍याच वेळा गलवानन खोऱ्यात आणि पॅनगोंग त्सो सरोवरात घुसखोरी केली आहे,” असं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

घुसखोरीबाबत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की आम्ही त्यांच्या धमकी व दबावापुढे झुकणार नाही किंवा आमच्या अखंडतेशी कोणतीही तडजोड स्वीकारणार नाही. पंतप्रधानां त्यांच्या वक्तव्याने चीनच्या षडयंत्रणेला बळ देऊ नये आणि सरकारची सर्व यंत्रणा या धोक्याचा सामना करण्यासाठी आणि परिस्थिती अधिक गंभीर होऊ नये यासाठी परस्पर संमतीने काम करावं.


हेही वाचा – भारत-चीन तणाव: संसदीय समितीची बैठक बोलावण्याची विरोधकांची मागणी, भाजपचा विरोध


माजी पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले की, अशी वेळ आली आहे जेव्हा संपूर्ण राष्ट्राने एकत्रित येऊन संघटित होऊन या धाडसाला प्रतिसाद दिला पाहिजे. आम्ही सरकारला इशारा देऊ की दिशाभूल करणारा प्रचार हा मुत्सद्दीपणा आणि मजबूत नेतृत्वाचा पर्याय कधीच असू शकत नाही. खोट्या प्रचारामुळे सत्य दाबले जाऊ शकत नाही, असंही मनमोहन सिंग म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -