घरदेश-विदेशचीनचे माजी अध्यक्ष जियांग झेमिन यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन

चीनचे माजी अध्यक्ष जियांग झेमिन यांचे वयाच्या 96 व्या वर्षी निधन

Subscribe

सुमारे एक दशक त्यांचे चीनवर शासन होते.

चीनचे माजी राष्ट्राध्यक्ष जियांग झेमिन यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. चीनच्या सरकारी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, ते ल्युकेमिया या आजाराने ग्रस्त होते. त्यामुळे त्यांच्या शरीरातील अनेक अवयवांनी काम करणे बंद केले होते. 1989 च्या तियानमेन स्क्वेअर हत्याकांडानंतर चीनचे नेतृत्व करण्यासाठी जियांग झेमिन यांची निवड करण्यात आली. सुमारे एक दशक त्यांचे चीनवर शासन होते. जियांगच्या कारकिर्दीत तियानमेन स्क्वेअरच्या निषेधानंतर चीनमध्ये कोणतीही मोठी निदर्शने झाली नाहीत.

हे ही वाचा – अल्पसंख्य समाजासाठी भारत उत्तम देश, अहवालातून बाब समोर

- Advertisement -

चीनच्या विकासात जियांग झेमिन यांचे महत्त्वाचे योगदान
जियांग हे फॅक्टरी इंजिनिअरपासून जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या चीनचे नेते बनले आणि चीनला जागतिक व्यापार, लष्करी आणि राजकीय शक्ती म्हणून उदयास आणले. 1989 मध्ये त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हा चीन आर्थिक आधुनिकीकरणाच्या सुरुवातीच्या टप्प्यात होता आणि तियानमेन हत्याकांडातून सावरण्याचा प्रयत्न करत होता.

हे ही वाचा –  अमेरिकेत समलिंगी विवाहाला मंजुरी; जो बायडन म्हणतात ‘प्रेम म्हणजे प्रेम असते…’

- Advertisement -

पण 2003 मध्ये जियांग राष्ट्राअध्यक्ष पदावरून निवृत्त झाले तोपर्यंत चीन जागतिक व्यापार संघटनेचा सदस्य बनला होता, ब्रिटनने हाँगकाँगचा ताबा दिला होता, बीजिंगने 2008 ऑलिम्पिक जिंकले होते आणि देश महासत्ता होण्याच्या मार्गावर होता.

हे ही वाचा – इंग्लंडमध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या निम्म्याहून कमी; मुस्लीम, हिंदूंची संख्या वाढली

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -