घरताज्या घडामोडीप्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या, राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या, राज ठाकरेंचं महाराष्ट्र सैनिकांना आवाहन

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. दौऱ्यावेळी राज ठाकरेंनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या, असं आवाहन राज ठाकरेंनी महाराष्ट्र सैनिकांना केलं आहे.

- Advertisement -

मी नागपूर दौऱ्यात असताना बोललो होतो तेच आत्ता बोलतोय की लढा हा त्या त्या ठिकाणच्या प्रस्थापितांशीच द्यायचा असतो. इतिहास हाच आहे की अनेक अभेद्य वाटणारे बालेकिल्ले सुद्धा पडले आहेत त्यामुळे प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या हेच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.

कोल्हापूरला येऊन देवीचं दर्शन घेऊन कोकण दौऱ्याला सुरुवात करावी अशी माझी इच्छा होती, त्यासाठी कोल्हापुरात आलो आहे. इथून मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे. आणि तो दौरा संपला की लवकरच मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे, असंही राज ठाकरे म्हणाले.

- Advertisement -


हेही वाचा : ‘या’ निमित्ताने उद्धव ठाकरे- प्रकाश आंबेडकर एकाच मंचावर; राजकीय समीकरणं बदलणार?


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -