घरदेश-विदेशपाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; ४ जवान शहीद

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; ४ जवान शहीद

Subscribe

पाकिस्ताकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. मंगळवारी रात्री पाकिस्तानने जम्मू-काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील चांबलियाल येथे शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात बीएसएफचे चार जवान शहीद झाले. तर, तीन जवान जखमी झाले. जवानांनी देखील या गोळीबाराला चोखप्रत्यूत्तर दिलं आहे.

- Advertisement -

४ जवान शहीद तर ३ जखमी 

मंगळवारी रात्री पाकिस्तानने रामगड सेक्टरमधील चांबलियाल येथील जवानांच्या चौकीला लक्ष्य केलं. या हल्ल्यात काही जवान जखमी झाले. त्यांना वाचवण्यासाठी आलेल्या सीआरपीएफच्या जवानांवर पाकिस्तानने बेछूट गोळीबार केला. या गोळीबारात बीएसएफचे चार जवान शहीद झाले. तर, तीन जवान जखमी झाले. पाकिस्तानच्या गोळीबाराला जवानांनी देखील सडेतोड उत्तर दिलं. शहीद जवानांमध्ये सहाय्यक कमांडो जतिंद्र सिंह, सब इन्स्पेक्टर रजनीश कुमार, एएसआई राम निवास आणि कॉन्स्टेबल हंसराज यांचा समावेश आहे. तर जखमी जवानांवर जम्मू-काश्मीरच्या सतवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

पाकिस्तानकडून खुरापती सुरुच 

गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. दहशतवाद्यांनी मंगळवारी पुलवामाच्या कोर्ट परिसरातील पोलीस चौकीवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये दोन पोलीस शहीद झाले. तर तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. तर, अनंतनागच्या जंगलात पेट्रोलिंगवर निघालेल्या सीआरपीएफ जवानांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सीआरपीएफचे १० जवान जखमी झाले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -