घर देश-विदेश तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणारा संशोधक नक्की कोण आहे? आता भारताच्या बाबतीत केलं...

तुर्की भूकंपाची भविष्यवाणी करणारा संशोधक नक्की कोण आहे? आता भारताच्या बाबतीत केलं भाकित

Subscribe

तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे हजारो घरे आणि इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या भूकंपामुळे सुमारे २१,००० अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाबाबत भूगर्भशास्त्रज्ञाने आधीच भाकित केलं होतं. तुर्की आणि सीरियामध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाची त्याने केलेली भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली. भूकंपाचे भाकीत करणारे डच संशोधक फ्रँक हूगरबीट्स सध्या चर्चेत आहेत. त्यांनी आता भारताबद्दलही एक भविष्यवाणी केलीय. हे डच संशोधक नक्की कोण आहेत, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक जण उत्सुक आहे. तसंच भारताबद्दल अशी कोणती भविष्यवाणी केलीय, हे पाहूयात…

Frank Huggerbeats हे सौर प्रणाली भूमिती सर्वेक्षण (SSGEOS) साठी कार्य करतात. फ्रँक हूगरबीट्स हे नेदरलँडचे रहिवासी आहेत. फ्रँक हूगरबीट्स ग्रहांच्या हालचालींवर आधारित भूकंपाचे भाकीत करतात. SSGEOS ही एक संशोधन संस्था आहे जी भूकंपाच्या क्रियाकलापांचा अंदाज घेण्यासाठी ग्रहांसारख्या खगोलीय वस्तूंचे निरीक्षण करते.

- Advertisement -

फ्रँक हूगरबिट्सने तुर्कीमध्ये भूकंपाचा अंदाज लावला होता. फ्रँक हगरबीट्सने असेही सांगितले होते की त्यांनी भविष्यवाणी करण्यापूर्वी संपूर्ण संशोधन केले होते. संशोधनातून त्यांनी अंदाज बांधला होता की तेथे भूकंपाशी संबंधित घडामोडी घडणार आहेत. त्यामुळे कोणतीही घटना घडण्याआधी लोकांना सावधानतेचा इशारा द्यावा, असा विचार त्यांनी केला.

- Advertisement -

या भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या…
२०१९ मध्ये आसाम आणि अरुणाचल प्रदेशमध्ये भूकंप झाला तेव्हा हुगरबीट्सने याआधीच याचा अंदाज वर्तवला होता आणि या भूकंपाचा इशारा दिला होता. यापूर्वी २०१९ मध्येच त्यांनी ८ जुलै ते ११ जुलै दरम्यान इराक आणि इराण सीमेवर भूकंप होण्याची शक्यता वर्तवली होती आणि ८ जुलै रोजी भूकंप झाला होता. यासोबतच त्यांनी कॅलिफोर्नियातील भूकंपाचीही माहिती दिली होती. त्यांनी जपान आणि नेपाळच्या भूकंपाबद्दलही सांगितले होते.

पण आता पुन्हा एकदा Hugarbeats च्या एका विधानाने किंवा म्हणावे असे भाकित समोर आले आहे.त्याने आता भारताबाबतही धक्कादायक अंदाज वर्तवला आहे. भारतीय उपखंडातही मोठा भूकंप होऊ शकतो, असा दावा फ्रँक हूगरबीट्सने एका व्हिडिओमध्ये केला आहे. फ्रँक हूगरबीट्स असेही म्हणत आहेत की हा भूकंप हिंद महासागर क्षेत्रात म्हणजेच भारत-पाकिस्तानसह अफगाणिस्तानच्या आसपासच्या अनेक भागात होऊ शकतो. ते म्हणाले की, अंदाजाबाबत अजूनही काही संभ्रम आहे, कारण भूकंप अफगाणिस्तानपासून सुरू होऊन हिंदी महासागरात पोहोचेल की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. २००१ प्रमाणे या भूकंपाचा भारतावर परिणाम होऊ शकतो. पण खात्री नाही. फ्रँक म्हणाले की त्यांनी तुर्कीच्या शास्त्रज्ञांशी संपर्क साधला होता, परंतु काही शास्त्रज्ञांनी यात रूची दाखवली, पण बहुतेक शास्त्रज्ञांनी यात रस दाखवला नाही. सीरियातून त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळाला. ते म्हणाले की भारत सरकारने त्यांच्याशी संपर्क साधल्यास ते त्यांना याबाबतीत मदत करण्यास तयार आहेत.

- Advertisment -