कंडोमशिवाय केला सेक्स; राजदूताविरोधात तक्रार दाखल

कंडोमशिवाय सेक्स केल्यामुळे एका महिलेने राजदूताविरोधात तक्रार दाखल केली आहे.

french ambassador is investigated after sex without condom
कंडोमशिवाय केला सेक्स; राजदूताविरोधात तक्रार दाखल

कंडोमशिवाय सेक्स करणे फ्रांसमधील एका राजदूतास महागात पडले आहे. कंडोमशिवाय सेक्स केल्यामुळे एका महिलेने राजदूताविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर कंडोमशिवाय सेक्स करुन संबंधित व्यक्तीने धोका दिल्याचे तक्रारीत देखील म्हटले आहे. ही व्यक्ती फ्रान्स सरकारची राजदूत असल्याचे समोर आले आहे.

डेली मेलने दिलेल्या माहितीनुसार; एका डेटिंग App द्वारे या दोघांची भेट झाली होती. तसेच संबंधित राजदूत आणि तक्रारदार महिलेने यापूर्वीही शरीरसंबंध ठेवले होते. तसेच त्यादिवशी देखील दोघांनी परस्पर संमतीने शरीरसंबंध ठेवले होते. मात्र, त्या दरम्यान, जोडीदाराने राजदूताला कंडोमचा वापर करण्यास सांगितले. परंतु, राजदूताने याकडे दुर्लक्ष केले आणि कंडोमचा वापर न करता शरीरसंबंध ठेवल्याचा आरोप महिलेने केला.

मिळालेल्या माहितीनुसार; या महिलेने सेक्स केल्यानंतर तीन दिवसानंतर ही तक्रार दाखल केली आहे. तर एका मासिकाच्या वृत्तानुसार, हा राजदूत पश्चिम आशियातील एका देशात कार्यरत आहे. फ्रान्समधील काद्यानुसार जबरदस्तीने शरीरसंबंध ठेवणे हा बलात्कार असतो. मात्र, जोडीदाराने कंडोम वापरण्याचा आग्रह केल्यानंतरही कंडोमशिवाय सेक्स केल्यास काय शिक्षा होऊ शकते याबाबत अद्याप समोर आलेले नाही.

फ्रान्समध्ये कोणती होते शिक्षा?

फ्रान्समध्ये एखाद्या व्यक्तीला शिवीगाळ करणे देखील लैंगिक अत्याचार मानला जातो. तर आरोपीला २ वर्षांची शिक्षा होऊ शकते. बलात्कारी आरोपीला जवळपास २० वर्षांची शिक्षा देण्याची तरतूद आहे. तर बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषींना कमीत कमी १५ वर्ष आणि जास्तीत जास्त ३० वर्ष तुरंगवासाची शिक्षा सुनावली जाते.


हेही वाचा – ‘बेरोजगारांची लग्न वेळेत होत नसल्यामुळेच बलात्कार वाढतायत’, काटजूंनी पाजळले ज्ञान