घरदेश-विदेश१८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

१८ जुलैपासून संसदेचे पावसाळी अधिवेशन

Subscribe

१८ जुलै ते १० ऑगस्ट या काळामध्ये संसदेचे पावसाळी अधिवेशन असणार आहे. २२ दिवसांच्या या अधिवेशनामध्ये एकूण १८ सत्र असतील.

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. १८ जुलै ते १० ऑगस्ट पर्यंत हे अधिवेशन चालणार आहे. राजनाथ सिंह प्रमुख असलेल्या कॅबिनेट कमिटी ऑफ पार्लमेंट्री अफेअर्स अर्थात सीसीपीएने संसदेच्या पावासाळी अधिवेशनाची तारीख जाहीर केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये एकूण १८ सत्र असणार आहेत. दरम्यान, संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विरोधक आणि सरकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये खडाजंगी पाहायाला मिळू शकते. दहशतवाद,इंधन दरवाढ आणि नीरव मोदी सारख्या अनेक प्रकरणांमध्ये विरोधक सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न करतील. शिवाय, सत्ताधारी भाजप देखील गुलाम नवी आझाद आणि सैफुद्दीन सोज सारख्या मुद्यांना पकडून काँग्रेसला धारेवर धरण्याची रणनिती आखणार ने नक्की! अनेक मुद्यांवरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये जुंपणार याबद्दल कोणतेही दुमत नाही. तर, राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा हाती घेतल्यानंतर त्यांचे हे पहिलेच अधिवेशन असणार आहे. सरकारवर ट्विटर आणि जाहीर सभांमधून टीका करणारे राहुल गांधी अधिवेशनामध्ये कोणती रणनिती अवलंबणार याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -