घरताज्या घडामोडीश्रीलंकेत एका रात्रीत पेट्रोल 82 तर डिझेल 111 रुपयांनी महागले, इंधनांच्या दरांनी...

श्रीलंकेत एका रात्रीत पेट्रोल 82 तर डिझेल 111 रुपयांनी महागले, इंधनांच्या दरांनी गाठला उच्चांक

Subscribe

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) एका रात्रीत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. श्रीलंकेत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑक्टेन 92 पेट्रोलचे (Petrol) दर 24.3 टक्क्यांनी म्हणजेच लीटरमागे 82 रुपयांनी वाढले आहेत.

आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) एका रात्रीत इंधनाच्या किंमती वाढल्या आहेत. श्रीलंकेत सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या ऑक्टेन 92 पेट्रोलचे (Petrol) दर 24.3 टक्क्यांनी म्हणजेच लीटरमागे 82 रुपयांनी वाढले आहेत. तर डिझेलच्या (Diesel) दरांमध्ये झालेल्या 38.4 टक्के वाढीमुळे लीटरमागे डिझेल 111 रुपयांनी महागले आहे. श्रीलंकेत 19 एप्रिलनंतर पुन्हा एकदा इंधनाच्या दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. देशाचे शक्ती आणि ऊर्जा मंत्री कांचना विजेस्कारा (Minister of Power and Energy Kanchana Vijeskara) यांनी ट्विटरवरुन याबाबत माहिती दिली आहे.

“इंधनाचे दर पहाटे तीन वाजल्यापासून बदलण्यात आले आहेत. केंद्रीय मंत्रीमंडळाने इंधनाच्या दरांबद्दल घेतलेल्या नव्या निर्णयांप्रमाणे आता दर निश्चित केले जाणार आहेत. बदललेल्या इंधनदरांमध्ये आयात, अपलोडिंग, वितरण आणि सर्व करांचा समावेश असेल”, असे कांचना विजेस्कारा यांनी ट्विटमध्ये म्हटले.

- Advertisement -

ऑक्टेन 92 पेट्रोलचे दर 420 रुपये लीटर म्हणजेच 1.17 अमेरिकन डॉलर्सला एक लीटर इतके आहेत. तर डिझेलचे दर 400 रुपये लीटर म्हणजेच १.११ डॉलर प्रती लिटर इतके आहेत. श्रीलंकेमधील इंधनाच्या दरांचा हा ऐतिहासिक उच्चांक आहे. त्याशिवाय, रिक्षाचालकांनीही आता प्रत्येक किलोमीटरसाठी किमान 90 रुपये आणि त्यापुढील प्रत्येक टप्प्यासाठी 80 रुपये आकारणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होत आहेत.


हेही वाचा – श्रीलंकेला भारताकडून 40000 मेट्रिक टन पेट्रोलची मदत

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -