घरदेश-विदेशG-Mail वापरण्यासाठीही द्यावे लागणार पैसे, Google लवकरच आणणार नवीन नियम

G-Mail वापरण्यासाठीही द्यावे लागणार पैसे, Google लवकरच आणणार नवीन नियम

Subscribe

सध्या गुगल जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमविण्याचे काम करत आहे. त्यामुळे येत्या काळात गुगल यू-ट्यूबच्या पावलावर पाऊल ठेऊन जाहिराती आणि विविध सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून पैसे कमविण्यासाठी हे नवीन नियम जारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे.

आजच्या काळात ज्याप्रमाणे स्वतःची ओळख दाखवण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड महत्त्वाचे आहे, त्याचप्रमाणे नवीन मोबाईल घेतल्यावर तो सुरू करण्यासाठी आणि त्या मोबाईलमध्ये आपली माहिती सेव्ह (जतन करण्यासाठी) करण्यासाठी G-Mail ची गरज असते. त्यामुळे स्मार्टफोन म्हंटल्यावर प्रत्येकाकडेच G-Mail हा असतोच. पण आता या G-Mailच्या वापराकरिता येत्या काही काळात पैसे मोजावे लागणार आहे, याबाबतची नवीन नियमावली लवकरच गुगलकडून जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा – सत्तासंघर्षाचे काउंटडाऊन : सर्वोच्च निर्णयाला उरले काही तास; पाहा कोण काय म्हणाले

- Advertisement -

सध्या गुगल जाहिरातीच्या माध्यमातून पैसे कमविण्याचे काम करत आहे. त्यामुळे येत्या काळात गुगल यू-ट्यूबच्या पावलावर पाऊल ठेऊन जाहिराती आणि विविध सबस्क्रिप्शनच्या माध्यमातून पैसे कमविण्यासाठी हे नवीन नियम जारी करत असल्याचे सांगण्यात येत आहे. (G-Mail will also have to be paid for, Google will soon introduce new rules)

मागच्या महिन्यात ट्विटरचे सर्वेसर्वा एलन मस्क यांनी ट्विटरवरील ब्लू टीक काढले होते. आधी हे ब्लू टीक मोफत मिळत होते. पण आता ट्विटरच्या नवीन नियमावलीनुसार, या ब्लू टीकसाठी यूझर्सना पैसे मोजावे लागत आहेत. त्याचप्रमाणे आता गुगलचा वापर करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. याआधी गुगल वापरण्यासाठी पैसे मोजावे लागत नव्हते का? तर असे नाहीये. G-Mailचे स्टोरेज म्हणजेच मेल बॉक्सची जागा भरल्यानंतर ती जागा वाढवण्यासाठी देखील पैसे मोजावे लागायचे. पण आता गुगलकडून ई-मेलची यादी पाहताना त्याआधी जाहिरात पाहावी लागणार. पण या जाहिराती पाहायच्या नसतील तर यासाठी मंथली सब्सक्रिप्शन मॉडल लागू करण्यात येऊ शकतो, अशी माहिती समोर आली आहे.

- Advertisement -

गुगल गेल्या आठवड्यापासून G-Mail मोबाइल आणि वेब दोन्ही या दोन्ही ठिकाणी जाहिरात दाखवत आहे. G-Mail मध्ये आधीही जाहिराती येत होत्या. परंतु, त्या जाहिराती मेल्सच्या टॉपवर म्हणजेच वरती दाखवण्यात येत होत्या. परंतु, आता जाहिराताली मेलच्या लिस्ट दरम्यान अॅड केले जात आहे. आतापर्यंत कंपनीकडून G-Mailला पेज करण्यावरून कोणत्याही प्रकारचे संकेत देण्यात आलेले नाहीत. परंतु, यूजर्सच्या म्हणण्यानुसार, जर कंपनी जाहिरात दाखवत आहे तर भविष्यात यासाठी पैशांची आकारणी केली जाऊ शकते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -