घरताज्या घडामोडीGallantry Awards: देशासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांचा गौरव; गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष...

Gallantry Awards: देशासाठी बलिदान देणाऱ्या योद्ध्यांचा गौरव; गलवानमध्ये शहीद झालेल्या कर्नल संतोष बाबू यांना मरणोत्तर महावीर चक्र

Subscribe

लडाखमधील गलवान खोऱ्यामध्ये चीन सैनिकांसोबत झालेल्या चकमकीत प्राणाची आहूती देणाऱ्या शहीद कर्नल संतोष बाबू यांना आज मरणोत्तर महावीर चक्र पदकाने गौरविण्यात आले. राष्ट्रपती भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यामध्ये आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सैनिकांना वीर चक्र पदकाने सन्मानित करण्यात आले. कर्नल संतोष बाबू यांच्यासह चार शहीद सैनिकांचा वीर चक्र देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शहीद सैनिकांच्या कुटुंबियांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. यादरम्यान राष्ट्रपती भवनमध्ये या शूर सैनिकांच्या आठवणींनी वातावरण भावूक झाले होते.

- Advertisement -

कर्नल संतोष बाबू यांच्यासह नायब सुभेदार नुदुराम सोरेन, हवालदार तेजेंद्र सिंह, नायक दीपक सिंह, शिपाई गुरतेज सिंह यांना मरणोत्तर वीर चक्रने सन्मानित करण्यात आले. कर्नल संतोष बाबूंसोबत हे सैनिक ऑपरेशन स्नो लेपर्ड दरम्यान गलवान खोऱ्यात शहीद झाले होते. २०२० मध्ये १५, १६ जूनदरम्यान रात्री चीन सैनिकांसोबत झालेल्या चकमकीमध्ये कर्नल संतोष बाबूंसह २० भारतीय जवान शहीद झाले होते. तसेच भारतीय सैनिकांनी आपले सामर्थ्य, साहस दाखवून चीनी सैनिकांचे देखील नुकसान केले होते.

दरम्यान ४ पॅरा स्पेशल फोर्सचे सुभेदार संजीव कुमार यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले आहे. ते जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमधील दहशतवाद्यांविरोधातील एका ऑपरेशनदरम्यान शहीद झाले होते. त्यांनी साहस दाखवत एका दहशतवाद्याचा खात्मा केला तर दोन जणांना जखमी केले होते.

- Advertisement -

हेही वाचा – महाराष्ट्राची शिखर कन्या प्रियंका मोहितेला क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार प्रदान; वाचा प्रियंकाचा साहसी प्रवास


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -