अमरावती दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारकडे मागणी

chandrakant patil demand retired judge inquiry in amaravati violence
अमरावती दंगलीची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा, चंद्रकांत पाटलांची राज्य सरकारकडे मागणी

महाराष्ट्रात मालेगाव, नांदेड आणि अमरावतीमध्ये झालेल्या दंगलीची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. अमरावतीमध्ये जे बंदमध्ये सहभागी झाले होते त्यांच्यावरच कारवाई करण्यात आली आहे. त्रिपुराच्या घटनेवरुन महाराष्ट्रात पडसाद उमटले यामुळेच अमरावतीमध्ये दंगल झाली. तसेच राज्य सरकार नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास घाबरत आहे. त्यामुळे त्यांनी मुंबईत अधिवेशन ठेवलं असल्याचा घणाघात चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अमरावतीमध्ये घडलेल्या हिंसाचारावरुन अजून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. या हिंसाचाराची चौकशी महाराष्ट्र पोलिसांद्वारे करण्यात येत आहे. परंतु न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

अमरावतीमध्ये बंद असताना जे उत्स्फुर्तपणे रस्त्यावर आले. अशा लोकांवर एका विशिष्ट गटाने हल्ला केला. मात्र पोलिसांनी त्या उत्स्फुर्त लोकांवरच गुन्हे दाखल केले आहेत. यामुळे या दंगलीची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांच्या मार्फत करण्यात यावी अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली. या जिल्ह्यात काहीतरी अद्श्यपणे चालले आहे. या सर्व गोष्टींचा समावेश करुन जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन पाठवावेव असे आवाहन देखील चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसेच रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

साताऱ्यातील दगडफेक नको व्हायला हवी होती

साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. या घटनेवर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाटील म्हणाले की, दुसऱ्याच्या घरातील भांडणावर मला काही बोलायचे नाही. मात्र असे व्हायला नको होते. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आजही भाजपचे नेते आहेत. त्यांनी आणि अतुल भोसलेंनी चर्चा करुन निर्णय घेतला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.


हेही वाचा : ‘पवारांचे ४० वर्षांपासून ST कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध, त्यांचं शोषण करणाऱ्यांना ते खड्यासारखं बाजूला ठेवतील’