घरदेश-विदेशब्रिटनमध्येही गणेशोत्सवाची धूम; ब्रिटिश सरकारच्या टाकसाळकडून गणराच्या प्रतिमेचे विशेष 'गोल्ड बार

ब्रिटनमध्येही गणेशोत्सवाची धूम; ब्रिटिश सरकारच्या टाकसाळकडून गणराच्या प्रतिमेचे विशेष ‘गोल्ड बार

Subscribe

हा सोन्याचा बार २४ कॅरेटचा असून २० ग्रॅम वजनाचा आहे. साधारणपणे १ लाख रुपये एवढी या सोन्याच्या बार ची किंमत असणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला केवळ १० हजार सोन्याचे बार (gold bar) विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

दरवर्षी सर्वजण गणरायाचं अगदी उत्सहात आणि आनंदात स्वागत करतात. या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी(ganeshotsav) अवघा एक महिना उरला आहे. मुंबई(mumbai) सह संपूर्ण राज्यातच गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. मुंबईत किंवा भारतात जस बाप्पाचं आगमन होतं, त्याच प्रमाणे परदेशातही बाप्पाच्या आगमनाची लगबग सुरु आहे. ब्रिटनमध्ये बाप्पाच्या स्वागताची विशेष तयारी करण्यात आली आहे.

हे ही वाचा – Vastu Tips : यंदा श्रावण महिन्यात लावा ‘हे’ झाड; संपूर्ण आयुष्यभर व्हाल मालामाल

- Advertisement -

ब्रिटनमध्ये शाही टाकसाळ कडून म्हणजेच रॉयल मिंट कडून श्री गणेशाची प्रतिमा असलेला एक सोन्याचा बार (gold bar) तयार करण्यात येणार आहे. हा सोन्याचा बार २४ कॅरेटचा असून २० ग्रॅम वजनाचा आहे. साधारणपणे १ लाख रुपये एवढी या सोन्याच्या बार ची किंमत असणार आहे. त्याचबरोबर सुरुवातीला केवळ १० हजार सोन्याचे बार (gold bar) विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत.

हे ही वाचा – बाल गणेश साकारणाऱ्या अवलियाकडे २०२३ पर्यंत ऑर्डर फुल्ल

- Advertisement -

या यादीही रॉयल मिंटने (royal mint) दिवाळीत लक्ष्मी देवीची प्रतिमा असलेला सोन्याचा बार बनविला होता. भारतीय देवी – देवतांच्या प्रतिमा असलेले सोन्याचे बार परतदेशात बनविले जात आहेत हे पहिल्यांदाच होत आहे. देवी लक्ष्मीच्या सोन्याच्या बारची ब्रिटनमध्ये उत्तम विक्री झाली. प्रशासनाला पुन्हा हे सोनायचे बार घडवावे लागले होते. या गोल्ड बारची सर्वाधिक विक्री धनत्रयोदशीच्या दिवशी झाली. यामध्ये सर्वाधिक ग्राहक हे ब्रिटिश भारतीय होते. ९९९. ९९ शुद्ध सोने असलेला हा देवी लक्ष्मीच्या प्रतिमेचा बार होता.

हे ही वाचा –  POP Ganesh Statue : पीओपी गणेशमूर्तींना पर्याय दिल्याशिवाय बंदी घालण्यास विरोध

दरम्यान या सोन्याच्या बार वर असलेली गणेशाची मूर्ती ही रॉयल मिंटच्या डिझायनर एम्मा नोबेल यांनी साकारली आहे. बापाचे अचूक चित्रण असलेली सर्व माहिती कबरीया यांनी रॉयल मिंटला तपशीलवार दिली.

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -