घरदेश-विदेशVideo : गुजरातमध्ये फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला एथनिक PPE किट गरबा ड्रेस

Video : गुजरातमध्ये फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी बनवला एथनिक PPE किट गरबा ड्रेस

Subscribe

नवरात्रीचा सण उद्या, शनिवारपासून सुरू होत आहे. मात्र यंदा इतर सणांसारखाच हा सणदेखील कोरोना संकटाच्या काळात साजरा करावा लागणार आहे. नवरात्रीची धूम ही नऊ दिवस गरबा खेळण्यामध्ये असते. मात्र सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे लागणार असल्याचे सरकारने यंदा गरब्यावरही निर्बंध घातले आहेत. पंरतू गरबा प्रेमींनी कोरोना काळातही गरबा खेळण्यासाठी युनिक आयडिया शोधून काढली आहे. सूरतमधील एका फॅशन डिझायनिंगच्या विद्यार्थ्यांनी खास पद्धतीची पीपीई किट्स बनवले आहेत. हे गरबा स्पेशल पीपीई किट खालून नवरात्रोत्सवाचा आनंद त्यांनी घेतला आहे.

- Advertisement -

गरबा खेळण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रंगाचे पीपीई किट्स बनवले आहेत. यामध्ये अॅथनिक टच देत मल्टी कलरची ओढणी त्याला जोडली आहे. गरबा ड्रेस अधिक आकर्षित बनवण्यासाठी त्याला विविध रंगांनी नक्षिकाम करून काचांची सजावटदेखील केली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गुजरात सरकारने यावर्षी नवरात्री उत्सवात गरबा कार्यक्रम करण्यास मनाई केली आहे. संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगितले की, राज्य सरकारने नवरात्रीसाठी कोविड १९ शी संबंधीत नियमावली जारी केली आहे. गुजरातमध्ये नवरात्रीत दरवर्षी मोठ्या प्रमाणात कार्यक्रम पार पडतात. मात्र सध्याच्या काळात अशा परिस्थितीत कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा –

रत्नागिरीतल्या दाऊदच्या वडिलोपार्जित संपत्तीचा लिलाव होणार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -