घरदेश-विदेशवडील आणि भावावर हत्येचा गुन्हा असलेली बेपत्ता मुलगी नऊ वर्षांनी परतली

वडील आणि भावावर हत्येचा गुन्हा असलेली बेपत्ता मुलगी नऊ वर्षांनी परतली

Subscribe

 

मध्य प्रदेशः एखाद्या चित्रपटाप्रमाणे मध्य प्रदेशात एक घटना घडली आहे. एक अल्पवयीन मुलगी २०१४ मध्ये घर सोडून गेली होती. तिच्या हत्येसाठी पोलिसांनी वडील आणि भावाला अटक केली. वडिल नुकतेच जामीनावर कारागृहाबाहेर आले आहेत. मात्र भाऊ जेलमध्येच आहे. अशी परिस्थितीत ती मुलगी परत आली आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

- Advertisement -

मध्य प्रदेश येथील छिंदवाडा येथे ही घटना घडली. कंचन असे या मुलीचे नाव आहे. २०१४ मध्ये कंचन घर सोडून गेली. पोलिसांनी याचा तपास केला. तपासात कंचनची हत्या झाल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला. यासाठी दोषी धरत पोलिसांनी कंचनच्या वडिलांना आणि भावाला अटक केली. मात्र कंचन अचानक घरी परतली. कंचन सध्या उज्जैन येथे राहते. पोलिसांनी भलत्याच कोणाचा मृतदेह माझा असल्याचा सांगितला आणि माझ्या वडिलांना, भावाला अटक केली, असा आरोप कंचनने केला आहे.

छिंदवाडा येथील शन्नू उइके यांची १५ वर्षीय मुलगी कंचन २०१४ मध्ये घरातून अचानक बेपत्ता झाली. शन्नू यांनी पोलिसांत याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी याचा तपास केला. त्यानंतर पोलिसांनी शन्नू यांच्या घराजवळ तपास केला. सात वर्षांनी पोलिसांनी घराजवळ खोदकाम केले. तेथे पोलिसांना शव मिळाले व सोबत बांगड्याही होत्या. कंचनचा भाऊ सोनूने तिची हत्या केली. त्यानंतर वडिलांच्या मदतीने कंचनचे शव घराजवळ दफन केले, असा आरोप पोलिसांनी केला. या हत्येसाठी पोलिसांनी शन्नू आणि त्यांचा मुलगा सोनूला अटक केली. या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. हे दोघेही कारागृहात होते. गेल्या वर्षी शन्नू यांना जामीन मिळाला. तर रोहित कारागृहातच आहे.

- Advertisement -

असे असताना कंचन अचनाक घरी परतली. कंचन आता विवाहित आहे. कंचन गावात परतल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. कंचनला बघून शन्नू आणि त्यांच्या पत्नीला अश्रू अनावर झाले. तर कंचनही भावूक झाली. कंचनला बघण्यासाठी शन्नूच्या घराजवळ एकच गर्दी झाली होती.

त्यानंतर कंचन आणि तिचे कुटुंब पोलीस स्टेशनला गेले. तेथे तिने सांगितले की, मीच कंचन आहे. मी स्वच्छेने घर सोडून गेली होती. मी आता सज्ञान आहे. माझा विवाह झाला आहे. माझ्या हत्येच्या खोट्या गुन्ह्यात वडिल आणि भावाला पोलिसांनी अटक केली आहे, असा आरोप कंचनने केला आहे.

शन्नूनेही पोलिसांवर गंभीर आरो केला आहे. कंचन बेपत्ता झाल्याची तक्रार आम्ही दिली होती. पण कंचनच्या हत्येसाठी मला आणि माझ्या मुलाला पोलिसांनी अटक केली. हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनी माझ्याकडे दोन लाख रुपये मागितले. याविरोधात मी १२१ हेल्पलाईनवर मदतही मागितली. मला मदत मिळाली नाही, असा आरोप शन्नूने केला आहे.

पोलीस ठाण्याचे प्रभारी धर्मेद्र कुशराम यांनी सांगितले की, हे प्रकरण सन २०१४ मधील आहे. सुरुवातीला मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली. नंतर त्याच मुलीच्या हत्येसाठी वडिल आणि भावाला अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण गंभीर आहे. वरीष्ठांना याची माहिती दिली आहे. याचा तपास सुरु आहे.

एएसपी संजीव उइके यांनी सांगितले की, बेपत्ता झालेली मुलगी परत आल्याने तिची डीएनए चाचणी केली जाईल. त्यानंतर याचा पुढील तपास केला जाईल.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -