गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावरही टॅक्स लागू ; जाणून घ्या ‘Gold In Gift’ टॅक्सचे नियम

भारतात एखाद्या लग्नात किंवा लहान मुलाचे बारसे अशा कार्यक्रमात लोकांना सोन्याची भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भेटवस्तू म्हणून मिळालेल्या सोन्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. एका निश्चित किमतीच्यावर जर तुम्ही सोन्याची भेटवस्तू देत असाल तर, तुम्हाला कर भरावा लागणार आहे.

Gold received as a gift is also taxable; Learn the 'Gold In Gift' tax rules
गिफ्टमध्ये मिळालेल्या सोन्यावरही टॅक्स लागू ; जाणून घ्या 'Gold In Gift' टॅक्सचे नियम

भारतात एखाद्या लग्नात किंवा लहान मुलाचे बारसे अशा कार्यक्रमात सोन्याची भेटवस्तू देण्याची परंपरा आहे. परंतु तुम्हाला माहीत आहे का? भेटवस्तू म्हणून मिळालेल्या सोन्यावर तुम्हाला कर भरावा लागू शकतो. एका निश्चित किमतीच्यावर जर तुम्ही सोन्याची भेटवस्तू देत असाल तर, तुम्हाला कर भरावा लागणार आहे.भेटवस्तूमध्ये मिळालेल्या सोन्यावर कर कसा लावला जातो,असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल,समजा तुम्हाला एखाद्या नातेवाईकाकडून भेट म्हणून सोने किंवा दागिने मिळाले असतील आणि त्या सोन्याची किंवा दागिन्यांची किंमत 50,000 रुपयांपेक्षा जास्त असेल तर, त्यावर कर भरावा लागेल.

जर वडिलांनी मुलीला तिच्या लग्नात सोने भेट दिले तर त्यावर कोणताही कर लागणार नाही. जर तुम्ही मुलांना त्यांच्या वाढदिवशी सोन्याचे दागिने गिफ्ट केले तर त्यावर कोणताही कर लागू होणार नाही. आईकडून सून आणि सासूकडून सूनेला देण्यात येणाऱ्या सोन्यावर कर भरावा लागणार नाही. अशा वारसा पद्धतीने मिळालेल्या सोन्यावर कोणतेही कर लागू होणार नाही.

सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी

ज्यांना आजपासून सोने खरेदी करायचे आहे, त्यांच्यासाठी सुवर्णसंधी आहे. सॉवरेन गोल्ड बाँड योजनेचा नववा टप्पा Sovereign Gold Bond scheme 2021-22 (Series IX) 10 जानेवारीपासून सुरू झाला आहे. या योजनेअंतर्गत आज म्हणजेच 10 जानेवारी ते 14 जानेवारीपर्यंत तुम्ही स्वस्तात सोने खरेदी करू शकता.RBI ने 2021-22 च्या नवव्या मालिकेतील सॉवरेन गोल्ड बाँडसाठी प्रति ग्रॅम 4786 रुपये इश्यू किंमत निश्चित केलीय. RBI ने या नवव्या टप्प्यासाठी सोन्याची किंमत 4786 रुपये प्रति गॅम हा मागील सीरिजपेक्षा कमी दराने निश्चित केलीय.

 


हेही वाचा – Breakfast : इंधन दरवाढीमुळे ब्रेड महागला; खव्वयांचे बजेट कोलमडले