घरदेश-विदेशसरकार मंकीपॉक्सवर लस आणण्याच्या तयारीत, फार्मा कंपन्यांशी चर्चा सुरू

सरकार मंकीपॉक्सवर लस आणण्याच्या तयारीत, फार्मा कंपन्यांशी चर्चा सुरू

Subscribe

देशात मंकीपॉक्सशी लढण्यासाठी सरकारने कंबर कसली आहे. सरकारने फार्मा कंपन्यांना या विषाणूच्या प्रतिबंधासाठी लस विकसित करण्यासाठी आमंत्रित केले आहे. बुधवारी सूत्रांनी सांगितले की, अनेक फार्मा कंपन्यांनी याबाबत सरकारशी चर्चा सुरू केली आहे.

वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सूत्रांनी सांगितले की, मंकीपॉक्सवर लस विकसित करण्यासाठी विविध लस उत्पादक कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. मात्र, अशा कोणत्याही निर्णयासाठी हा अगदी सुरुवातीचा टप्पा आहे. आमच्याकडे संभाव्य उत्पादक आहेत. भविष्यात गरज पडल्यास पर्याय शोध घेतला जाईल.

- Advertisement -

एका लस उत्पादक कंपनीने सांगितले की, मंकीपॉक्सवर अशी कोणतीही विशिष्ट लस सध्या उपलब्ध नाही आणि विषाणू म्‍यूटेट झाला आहे. भविष्यात केसेस वाढल्या तर लसीची गरज भासेल. मंकीपॉक्सच्या संभाव्य लसीबाबत अनेक औषध कंपन्या सरकारशी चर्चा करत आहेत. भारतात आतापर्यंत मंकीपॉक्सची ४ प्रकरणे आढळून आली आहेत. यापैकी तीन रुग्ण केरळमध्ये तर एक रुग्ण दिल्लीत आढळून आला आहे.

NITI आयोगाचे सदस्य डॉ व्ही के पॉल यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की भारत मांकीपॉक्सशी लढण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आमची रोग निगराणी यंत्रणा अशा प्रकरणांचा तपास करण्यासाठी अधिक सक्रिय झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात असून घाबरण्यासारखे काही नाही.

- Advertisement -

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) शनिवारी मंकीपॉक्सला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले. तथापि, डब्ल्यूएचओचे प्रमुख डब्ल्यूएचओ महासंचालक टेड्रोस अढानम घेब्रेयेसस यांनी असेही म्हटले आहे की ‘भेदभाव हा विषाणूइतकाच हानिकारक असू शकतो.अलीकडेच डब्ल्यूएचओच्या दक्षिण-पूर्व आशियाच्या प्रादेशिक संचालक डॉ. पूनम खेत्रपाल यांनी चिंता व्यक्त केली होती की, आता ज्या देशांमध्ये पूर्वी एकही रुग्ण आढळला नव्हता अशा देशांमध्येही मंकीपॉक्सची प्रकरणे आढळून आली आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -