घरराजकारणगुजरात निवडणूकगुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान; 8 डिसेंबरला मतमोजणी

गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी 1 आणि 5 डिसेंबरला मतदान; 8 डिसेंबरला मतमोजणी

Subscribe

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे 1 डिसेंबर 2022 रोजी आणि दुसऱ्या टप्प्याचे 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गुजरातमध्ये दोन टप्प्यात विधानसभा निवडणूक होणार आहे.  गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे 1 डिसेंबर 2022 रोजी आणि दुसऱ्या टप्प्याचे 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. तसेच, 8 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. गुरूवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत गुजरात विधानसभा निवडणुकीसंदर्भात माहिती दिली. (Gujarat Assembly Elections On Election Commission press conference)

गुजरातमध्ये 10 ऑक्टोबर 2022 रोजी प्रकाशित झालेल्या मतदार यादीनुसार 4.9 कोटी मतदार नोंदणीकृत आहेत. त्यापैकी 4.04 लाख दिव्यांग मतदार आहेत. तसेच, 9.8 लाख 80+ ज्येष्ठ नागरिक आणि 4.61 लाख युवा मतदार आहेत.

- Advertisement -

गुजरात विधानसभेत 182 सदस्य असून, या विधानसभेचा कार्यकाळ 18 फेब्रुवारी 2023 रोजी संपणार आहे. त्यामुळे गुजरात विधानसभा निवडणूक नोव्हेंबर महिन्याच्या अखेरिस किंवा डिसेंबरमध्ये मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गुजरातमध्ये दोन टप्प्यांत निवडणुका घेतल्या जातात.

गुजरातपूर्वी निवडणूक आयोगाने हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या तारखेची घोषणा केली होती. हिमाचल प्रदेशमध्ये 12 नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. तर मतमोजणी 8 डिसेंबर रोजी केली जाणार आहे.

- Advertisement -

गेल्या २५ वर्षांपासून भाजपाची सत्ता असलेल्या गुजरातच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. यावेळची लढत केवळ भाजपा आणि काँग्रेसमध्ये होणार नाहीये, तर दिल्ली आणि पंजाबमध्ये दणदणीत विजय मिळवणाऱ्या आपनेही गुजरातच्या आखाड्यात उडी घेतली आहे.


हेही वाचा – Supreme court : ‘या’ राज्यांतील हिंदूंना अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यासाठी केंद्राला हवा आणखी वेळ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -