घरदेश-विदेशGujarat Covid Hospital Fire : पंतप्रधानांनी केली मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत...

Gujarat Covid Hospital Fire : पंतप्रधानांनी केली मृतांच्या कुटुंबियांना २ लाखांची मदत जाहीर

Subscribe

ही आग आयसीयूमध्ये लागल्याचे समजते. त्यावेळी आयसीयूमध्ये १० कोरोना रुग्ण होते. तर संपूर्ण हॉस्पिटलमध्ये ४९ कोरोना रुग्ण होते. यामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे.

मृतांची नावे –

  1. अरविंद भावसार
  2. नवीनलाल शाह
  3. लीलावती शाह
  4. आयशाबेन तिरमीश
  5. मनुभाई रामी
  6. ज्योति सिंधी
  7. नरेंद्र शाह
  8. आरिफ मंसूर

दरम्यान, स्थानिक प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये धाव घेत परिस्थितीचा आढावा घेतला आहे. आग लागल्याचे कारण शॉर्ट सर्किट सांगितले जात आहे. मात्र सध्या फॉरेंसिक विभागाची टीम याचा तपास करत आहेत. गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी ३ दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.

- Advertisement -

गुजरातच्या श्रेय हॉस्पिटलमध्ये लागलेल्या भीषण आगीत ८ कोरोना रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी पंतप्रधान सहायता निधीतून मृत्यांच्या कुटुंबियांना २ लाखाची तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.

- Advertisement -

गुजरात अहमदाबाद येथील नवरंगपुरामधील श्रेय हॉस्पिटलमध्ये आज पहाटे भीषण आग लागल्याची माहिती समोर येत आहे. या आगीत ८ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हे सर्व रुग्ण कोरोनाग्रस्त असल्याचे समजते. तर इतर ३५ रूग्णांना तातडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. ही आग आयसीयूमध्ये लागल्याचे समजते. या हॉस्पिटलमध्ये कोविड १९ चे रूग्णदेखील उपचार घेत असून अद्याप आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही.

दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. पहाटे साडेतीनच्या सुमारास ही आग लागल्याची माहिती समोर येत आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४० जणांना यातून वाचवण्यात आले आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा –

Mumbai Rain: जोरदार पावसाने मुंबईत मोडला ४६ वर्षांचा विक्रम!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -