घरताज्या घडामोडीवडोदरातील केमिकलच्या कारखान्याला भीषण आग; ७ जण जखमी, ७०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

वडोदरातील केमिकलच्या कारखान्याला भीषण आग; ७ जण जखमी, ७०० लोकांना सुरक्षितस्थळी हलवले

Subscribe

गुजरातमधील (Gujarat) वडोदरा (Vadodara) परिसरात असलेल्या एका केमिकलच्या कारखान्याला (Chemicle Factory) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत या कारखान्यातील ७ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे.

गुजरातमधील (Gujarat) वडोदरा (Vadodara) परिसरात असलेल्या एका केमिकलच्या कारखान्याला (Chemicals Factory) भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत या कारखान्यातील ७ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात (Hospital) दाखल करण्यात आले आहे. शिवाय, या कारखान्याच्या आसपासच्या परिसरात राहणाऱ्या एकूण ७०० लोकांना सुरक्षास्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. कारखान्याला लागलेली आग ही भीषण असल्याने स्थानिकांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

गुजरातमधील वडोदरा शहराच्या नजीक असलेल्या नंदेसरी जीआयडीसीमधील (Nandesari GIDC) दीपक नायट्राइड कंपनीमध्ये स्पोट (Blast) झाला. या स्पोटामुळे भीषण आग लागली. गुरूवारी संध्याकाळच्या सुमारास ही आग लागली. या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांनी धाव घेतली. तसेच, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न करण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, या आगीत ७ जण गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. शिवाय ७०० आसपासच्या स्थानिकाना स्थलांतरीत करत सुरक्षास्थळी नेण्यात आले आहे. या घटनेबाबत वडोदरा जिल्हा दंडाधिकारी आरबी ब्रार यांनी सांगितले की, भीषण आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून, ज्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मात्र, आगीमुळे धुराच्या लोळात पडलेल्या सात जणांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. खबरदारी म्हणून कारखान्याजवळच्या ग्रामीण भागात राहणाऱ्या सुमारे ७०० लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Mohan Bhagwat : रोज एका मशिदीमध्ये शिवलिंग का बघायचं? ज्ञानवापीवरुन मोहन भागवतांचे वक्तव्य

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -