घरट्रेंडिंग'या' व्हायरल फोटोमध्ये लपलाय इंग्रजीचा एक शब्द, तुम्ही शोधून दाखवाच

‘या’ व्हायरल फोटोमध्ये लपलाय इंग्रजीचा एक शब्द, तुम्ही शोधून दाखवाच

Subscribe

Donut_Playz_7573 नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडिया साईट Reddit वर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर चष्मा लावलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसतोय. व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग (फेस ऑप्टिकल इल्युजन) तुम्हाला दिसेल.

नवी दिल्ली : सोशल मीडियावर अनेकदा वेगवेगळ्या पोस्ट व्हायरल होत असतात, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या अनेक पोस्ट या गमतीदारही असतात, बऱ्याचदा असे काही फोटो व्हायरल होतात, ते पाहिल्यानंतर प्रत्येकाचे डोके चक्रावून जाते. त्यामध्ये ऑप्टिकल इल्युजन असलेली छायाचित्रे शेअर केलेली असतात. असे काहीतरी वेगळे या चित्रांमध्ये नक्कीच असते, ज्याद्वारे लोकांच्या तीक्ष्ण नजरांची चाचपणी घेतली जाते. आता पुन्हा एकदा सोशल मीडिया यूजर्ससाठी नवीन आव्हान समोर आले आहे. सोशल मीडियावर पुन्हा एक फोटो व्हायरल झाला असून, या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये एक चेहरा दिसत आहे, पण त्यात काहीतरी लिहिले आहे, ज्याचा शोध घेताना अनेकांना घाम फुटला आहे.

Donut_Playz_7573 नावाच्या वापरकर्त्याने सोशल मीडिया साईट Reddit वर एक पोस्ट शेअर केली. ज्यामध्ये पहिल्यांदा पाहिल्यावर चष्मा लावलेल्या व्यक्तीचा चेहरा दिसतोय. व्यक्तीच्या चेहऱ्याचा फक्त समोरचा भाग (फेस ऑप्टिकल इल्युजन) तुम्हाला दिसेल. या चित्रात नाक, तोंड, घसा आणि डोळ्यांना चष्मा घातलेला दिसतो. पण या चित्रात आणखी काही दडलेले आहे. जर तुम्ही चित्र नीट बघितले तर तुम्हाला एक इंग्रजी शब्दही लिहिलेला दिसेल.
आता हे चित्र डावीकडून पाहिल्यास Liar हा इंग्रजी शब्द वाचायला मिळेल. चष्मा असलेले डोळे आणि नाक L अक्षराप्रमाणे बनवलेले असतात, तर नाकातील छिद्र आणि त्याच्या हलक्या भागावर I (I) अक्षर आहे. तसेच दोन्ही ओठ मिळून A (A) तयार होत आहे, तर हनुवटीपासून घशापर्यंतचा भाग R (R) सारखा दिसत आहे. हे चित्र जितकं साधं दिसतंय तितकंच समजून घेण्यासाठी कठीण आहे.

ही ऑप्टिकल इल्युजन पोस्ट सोशल मीडियावर शेअर होताच त्यावर लोकांनीही वेगाने प्रतिक्रिया नोंदवायला सुरुवात केली. हे छायाचित्र पाहिल्यानंतर एका यूजरने लिहिले की, या चित्रात असा शब्द लपला असेल, असे मला वाटलेही नव्हते. त्याचवेळी आणखी एका यूजरने सांगितले की, प्रत्यक्षात हे चित्र कोणाच्याही डोळ्यांना फसवू शकते. अनेकांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरूनही हा फोटो शेअर केला आहे.

- Advertisement -

हेही वाचाः लातूरकरांना तब्बल 45 दिवसांनंतर स्वच्छ पाणीपुरवठा सुरू

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -