घरताज्या घडामोडीभुकेल्या प्रवासी मजुराला नोडल अधिकारी म्हणाला, ट्रेनमधून उडी मार!

भुकेल्या प्रवासी मजुराला नोडल अधिकारी म्हणाला, ट्रेनमधून उडी मार!

Subscribe

देशात कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भाव लक्षात घेऊन लॉकडाऊन जारी करण्यात आला. पण या लॉकडाऊन अनेक मजूर विविध राज्यात अडकले. मग त्यांच्याकडे मजुरी नसल्याने आणि उपासमारीची वेळ आल्याने ते आपापल्या राज्यात वाटले तो मार्ग स्वीकारून ते जाऊ लागले. अजूनही काही मजुरांची पायपाटी सुरू आहे. दरम्यान एनडीटीव्ही वृत्तानुसार, झारखंड मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने एका मजूरासोबतचे असंवेदशील वर्तन केल्याचे समोर आले आहे. ज्यामुळे प्रशासकीय यंत्रणेला धक्का बसला आहे.

झारखंड सरकारने मजुरांना राज्यात परत आणण्यासाठी एक व्यवस्था केली आहे. याचे व्यवस्थापन मुख्य वरिष्ठ आयएएस एपी सिंह करत आहेत. याच अंतर्गत सरकारच्या वतीने मुजरांसाठी झारखंडचे नोडल अधिकारी करण्यात आले आहेत. हे अधिकारी थेट रिपोर्ट मुख्य सचिवांना करतात. मजुरांना काही अडचण असल्यास प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांशी ते संपर्क साधू शकतात. यासाठी मजुरांना प्रत्येक नोडल अधिकाऱ्यांचा नंबर देण्यात आला आहे. पण मुख्य वरिष्ठ आयएएस एपी सिंह स्थलांतरित मजुरांच्या असहायतेबद्दल असे काही म्हणाले की ज्यामुळे त्याच्या वर्तनातून असंवदेनशीलपणा दिसून आला आहे.

- Advertisement -

मजुराशी फोन बोलताना काय म्हणाले आयएएस एपी सिंह?

प्रवासी मजूर – हॅलो सर, हॅलो…..हॅलो….
एपी सिंह – हॅलो…..

प्रवासी मजूर – हॅलो सर नमस्कार….
एपी सिंह – नमस्कार

- Advertisement -

प्रवासी मजूर – हा फोन एपी सिंह सरांचा आहे…
एपी सिंह – तुम्ही कोण बोलत आहात?

प्रवासी मजूर – आम्ही झारखंडमधील स्थलांतरित मजूर बोलत आहोत. सर, आम्ही स्पेशल ट्रेनमधून परत येत आहोत. सकाळपासूनच मला जेवण मिळालं नाही. आम्ही भुकेने त्रस्त झालो आहोत.
एपी सिंह – ठीक आहे. जेवण रेल्वेला द्यावे लागेल. रेल्वे जेवण देईल.

प्रवासी मजूर – कधी देणार सर. सकाळी ब्रेडचे एक पाकिट, केळी आणि पाण्याची बाटली दिली आहे. दिवसभर एवढ्यावरच आहे. काय करणार पुढे सर…
एपी सिंह – तिथून उडी मारा. आणखी काय करणार?

प्रवासी मजूर – उडी मारणे चांगले राहील का?
एपी सिंह – प्रवासात जे काही द्याचे ते आम्ही नाही रेल्वेने द्यायचे आहे.
मग फोन डिस्कनेक्ट झाला.


हेही वाचा – कराची अपघाताच्या अवशेषांमध्ये सापडली तीन कोटींची रोख रक्कम!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -