तीन मोदी… अन् हर्ष गोयंका यांचे मजेशीर ट्वीट

मुंबई : सोशल मीडियामुळे अनेकांच्या प्रतिभेला धुमारे फुटले आहेत. एकेकाची कल्पनाशक्ती पाहून सर्वच अचंबित होतात. सोशल मीडियावर अशा कल्पक पोस्ट टाकण्यात अनेक मान्यवर देखील मागे नाहीत. उद्योगपती आनंद महिंद्रा यांच्या अशा पोस्ट तर चर्चेत असतातच, पण सध्या उद्योगपती हर्ष गोयंका यांची पोस्ट चर्चेत आहे.

आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी आणि बॉलिवूड अभिनेत्री सुश्मिता सेन यांच्या अफेअर्सची चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. खुद्द ललित मोदी यांनी ट्विट करून माझ्या आयुष्याची नवी सुरुवात असं म्हणत सुश्मितासोबतचा फोटो शेअर केले होते. त्यामुळे या दोघांनी लग्न केल्याचे सांगितले जात होते. पण नंतर आम्ही लग्न केले नसून एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा ललित मोदी यांनी केला आहे.

सीएट टायर बनवणाऱ्या आरपीजी ग्रुपचे चेअरमन हर्ष गोयंका यांनी यावरूनच एक मजेशीर ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ललित मोदी आणि नीरव मोदी यांचा फोटो शेअर करत, ‘एका मोदींना भारत हवा आहे, एका मोदीना मिस इंडिया हवी आहे तर, तिसरा मोदी भारताला हवा आहे,’ अशी कॅप्शन दिली आहे. या आधी त्यांनी सुश्मिता सेन आणि ललित मोदी यांचा फोट शेअर करत ‘मिस इंडिया + मिसिंग इंडिया’ अशी कॅप्शन दिली होती.

तर, त्यांनी पडदा लावलेल्या एका ऑटो रिक्षाचा फोटो देखील यापूर्वी शेअर केला होता. त्यावर अनेकांनी कमेंट केली होती. प्रसिद्ध गायक अदनान सामी यांनी ‘पर्दे में रहने दो पर्दा न उठाओ…’ अशी कमेंट टाकली होती.