Eco friendly bappa Competition
घर मनोरंजन महेश मांजरेकरांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

महेश मांजरेकरांवर टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

Subscribe

दिग्दर्शक महेश मांजरेकर सध्या त्यांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटामुळे तसेच ‘बिग बॉस मराठी 4’ या कार्यक्रमामुळे चर्चेत असतात. दरम्यान, आता आणखी एका वेगळ्या कारणामुळे महेश मांजरेकर चर्चेत आले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, महेश मांजरेकर यांच्या विकोधात गुन्हा दाखल झाला असून कोर्टाने या प्रकरणासंबंधीत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. खरंतर महेश मांजरेकर यांच्यावर हा गुन्हा एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाविरोधात अर्वाच्य शब्दात वक्तव्य केल्यामुळे दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, 2021 मध्ये पुणे-सोलापूर महामार्गावर महेश मांजरेकर यांच्या गाडीचा अपघात झाला होता. त्यावेळी त्यांच्या गाडीचा ज्या दुसऱ्या गाडीसोबत अपघात झाला ती गाडी एका आश्रमशाळेच्या संस्थाचालकाची होती. महेश मांजरेकर यांनी त्या संस्थाचालका विरोधात बदनामी करणारं वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पंढपूरमधील माढा न्यायालयाने टेंभुर्णी पोलिसांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

- Advertisement -

टेंभुर्णी येथील संत रोहिदास आश्रमशाळेचे संस्थापक कैलास सातपुते आणि महेश मांजरेकर यांच्या गाड्यांचा पुणे-सोलापूर महामार्गावरील यवत गावाजवळ अपघात झाला होता. त्यावेळी महेश मांजरेकर यांनी सातपुतेंची बदमानी करणारे वक्तव्य केल्याचा आरोप सातपुते यांनी केला होता.

मांजरेकरांचा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटही वादाच्या कचाट्यात

- Advertisement -

महेश मांजरेकर दिग्दर्शित ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार साकारत आहे. अक्षय कुमारच्या या भूमिकेवरून आता प्रेक्षकांकडून सिनेमाला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. शिवाय या सिनेमातील मावळ्यांचा लूक शेअर केल्यानंतर अनेकांनी आक्षेप घेतला होता.


हेही वाचा :

बॉलिवूड गाणी इन्स्टाग्राम रील्ससारखी…; ‘बेशरम रंग’ गाण्यावर विवेक अग्निहोत्रींची टीका

shivani patil
shivani patilhttps://www.mymahanagar.com/author/shivanipatil/
मनोरंजन, भक्ती, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड, वाचणाची आवड
- Advertisment -