घरदेश-विदेशऐकावं ते नवलंच! कोंबडीने अंड न देता दिला पिल्लाला जन्म

ऐकावं ते नवलंच! कोंबडीने अंड न देता दिला पिल्लाला जन्म

Subscribe

यापूर्वी २०१८ मध्ये केरळमधील वायनाड आणि २०१२ मध्ये श्रीलंकामध्येही अशीच घटना घडली आहे

‘पहले मुर्गी आई या फिर पहले अंडा’ ही म्हण आपण बर्‍याच वेळा ऐकली असेल, मात्र असे ऐकले आहे का, की कोंबडीने अंडयाच्या जागी पिल्लाला जन्म दिलाय. हे वाचून नवल वाटेल पण…होय, हे सत्य आहे. ओडिशाच्या नुआपाड़ा येथे हा प्रकार घडला आहे, जेथे कोंबडीने अंड न देता थेट पिल्लाला जन्म दिला आहे. यामुळे त्या भागातील लोकांनाही हे ऐकून नवल वाटले आहे.

असा घडला प्रकार

नुआपाडा जिल्ह्यातील इच्छापुर गावात अंबिका मांझी यांच्या घरात एका कोंबडीने पिलाला जन्म दिला. मात्र पिल्लाला जन्म दिल्यानंतर १० मिनिटानंतर या पिल्लूचा मृत्यू झाला. इच्छापूर गावात ही कोंबडी आपल्या ९ अंड्यांना ऊब देत होती. या दरम्यान ती कोंबडी त्या जागेवरून दूसरीकडे जाऊन बसली. बऱ्याच वेळ ती एकाच जागी होती, ती तेथून उठत नव्हती तेव्हा काही लोकांनी तिला जवळ जाऊन पाहिले, त्यावेळी या कोंबडीने पिल्लाला जन्म दिला होता. कोंबडीच्या आजू-बाजूला तुटलेलं अंड किंवा कवच आहे का हे पाहिले, परंतू तिच्या जवळ ते नव्हते.

- Advertisement -

पशुवैद्य देखील हैरान

या घटनेसंदर्भात नुआपाडा जिल्ह्याचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. त्रिलोचन ढल म्हणाले की, आयुष्यात अशी घटना त्यांनी कधी पाहिली नव्हती. पण त्यांनी सांगितले की बहुधा कोंबडीच्या प्रजनन प्रक्रियेतच कोंबडीहे पिल्लू तयार झालं असावं. त्यामुळे कोंबडीने अंड देण्याऐवजी थेट पिल्लाला जन्म दिला. ते असेही म्हणाले की कोंबडीने अंड दिल्यानंतर कोंबडी २१ दिवस तिच्या अंड्यांना ऊब देते, ज्यापासून कोंबडीचे पिल्लू जन्माला येते.

यापूर्वी २०१८ मध्ये केरळमधील वायनाड आणि २०१२ मध्ये श्रीलंकामध्येही अशीच घटना घडली आहे. त्या दोन्ही घटनांमध्ये देखील पिल्लाचा जीव गेला होता.


…या निर्णयामुळे कुवेतमधील ८ लाख भारतीयांवर येणार संकट!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -