घरदेश-विदेशगृहिणींनो स्वतःला कमी समजू नका, ही बातमी वाचा, अर्थव्यवस्थेतील तुमचं स्थान...

गृहिणींनो स्वतःला कमी समजू नका, ही बातमी वाचा, अर्थव्यवस्थेतील तुमचं स्थान…

Subscribe

International Women’s Day | नवी दिल्ली – शैक्षणिक प्रगती झाल्याने नोकरदार महिलांचं प्रमाणही वाढलं आहे. परंतु, आजही जगभरात विना वेतन काम करणाऱ्या महिलांची संख्या अधिक आहे. आंतररष्ट्रीय श्रम संघटनेच्या २०२२ अहवालानुसार जगभरातील ६४ देशांमध्ये महिला दररोज १६४० तास विनावेतन काम करतात. एकूण जीडीपीच्या नऊ टक्के या विना वेतन कामाचे मूल्य आहे. तर, आशिया आणि पॅसिफिक भागात विनावेतन महिला पुरुषांच्या तुलनेत ४.१ पट जास्त काम करतात. त्यामुळे गृहिणी म्हणून तुम्हाला कमीपणाचे वाटत असेल तर ही बाब तुमच्यासाठी अभिमानाची आहे की तुम्ही कमावत्या पुरुषांच्या तुलनेत अधिक काम करता.

पूर्वी महिला फक्त घराचा कारभार सांभाळत असत. फार कमी महिलांकडे व्यवहार असायचा. परंतु, आता महिला कमावत्या झाल्यापासून त्या घराच्या अर्थव्यवस्थेसह देशाची अर्थव्यवस्थाही सांभाळतात. त्यामुळे त्यांच्या उन्नतीमुळे देशाची खरंतर प्रगती होत आहे. परंतु, असे असले तरीही ज्या महिला इतर कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे नोकरी करू शकत नाहीत, ज्या महिला गृहिणी म्हणून घरातील कामे करतात त्यांची जगाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. कारण, घरातील महिलांमुळेच पुरुष कामावर व्यवस्थित आणि वेळेत पोहोचू शकतात.

- Advertisement -

काही महिला नोकरी व्यवसाय सांभाळून घरही सांभाळतात. ग्रामीण भागात हे प्रमाण पाच टक्के असून शहरी भागात ३० टक्के आहे. म्हणजे, शहरातील ३० टक्के महिला नोकरदार असून गृहिणीही आहेत. अर्थव्यवस्थेतील त्यांचं स्थान पुरुषांच्या तुलनेत चांगलं आहे.

जीडीपीत योगदान
गेल्या काही वर्षांपासून गृहिणींना सरकारी पातळीवर वेतन मिळावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे. अनेक देशांमध्ये गृहिणींच्या नावे अनेक योजना आहेत. भारतातही गृहिणींसाठी अनेक योजना राबवल्या जातात. स्टेट बँक इकोनॉमिक रिसर्च विभागानुसार, विनावेतन घरात राहणाऱ्या गृहिणींचा जीडीपीतील वाटा २२.७ टक्के आहे. यामध्ये भारतीय महिलांचं योगदान १४.७टक्के असून शहरी भागांतून अंदाजे ८ लाख कोटी रुपयांचं योगदान दिलं जातं.

- Advertisement -

आरोग्याकडे दुर्लक्ष
गृहिणी दिवसभर घरातच असल्या तरीही त्यांना आराम मिळत नाही, हे त्यांच्या आरोग्याच्या स्थितीकडे पाहून लक्षात येतं. अनेक महिलांना विविध आजारांनी आणि व्याधींनी ग्रासलेलं आहे. असमतोल आहार आणि अपुरी झोप यामुळे हे आजार बळावले आहेत. तर, फक्त २४ टक्के महिलाच क्वालिटी टाईम व्यतीत करतात. घरात काम करणाऱ्या दहापैकी सात महिला स्वतःसाठी जराही वेळ देऊ शकत नाही, इतक्या त्या व्यस्त असतात. एवढंच नव्हे तर अनेक घरात कौटंबिक वादविवाद सुरू असल्याने अनेक महिला मानसिक तणावात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -