घरदेश-विदेशIncome Tax Refund मध्ये व्याज न आल्यास कसे कराल चेक? या सोप्या...

Income Tax Refund मध्ये व्याज न आल्यास कसे कराल चेक? या सोप्या आयडिया वापरा

Subscribe

Income Tax Refund आले आहे परंतु त्यात व्याज न आल्यास कसे चेक करायच? असा प्रश्न अनेकांना पडत आहे. कारण प्रत्येक Taxpayer ला वाटते की Income Tax Refund सह व्याजही येईल, परंतु यातील Fact काही वेगळाच आहे. कारण Income Tax नियमांप्रमाणे प्रत्येक Refund वर व्याज मिळत नाही.

Tax liability कमी

कर भरल्यानंतर जर तुमची Tax liability कमी असेल तरच तुम्ही Income Tax Refund साठी Eligible आहात. म्हणजे TDS, TCS किंवा दुसऱ्या प्रकारे Tax जास्त कट झाल्यास परंतु तुमचा खरा Tax कम असल्यास Income Tax विभाग आपल्यास Refund देईल. या IT Refund ला Taxpayer रिर्टन भरून घेऊ शकतो. Income Tax department ITR ची प्रोसेस केल्यानंतर Income tax refund देईल.

- Advertisement -

Income Tax Refund वरील व्याज

Tax Expert आणि CA अरविंद दुबे यांच्या मते, Tax Refund वर व्य़ाज तेव्हाच मिळते जेव्हा आपली
थकबाकीची रक्कम ज्यावरील Tax १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. ITR दाखल केल्यानंतर रिफंड वेळेवर येत नाही. याचे कारण म्हणजे रिटर्न फाइल करतेवेळी पूर्ण माहिती न देणे हे असू शकते. रिटर्न दाखल करतेवेळी बँक खात्याची योग्य संख्या, बँकेचा योग्य IFSC कोड भरणे गरजेचे आहे. जर बँकेच्या IFSC कोडमध्ये जराही गडबड झाल्यास रिफंड मिळत नाही.

कोरोनामुळे उद्योग-धंदे ठप्प

कोरोना महामारीमुळे उद्योग-धंदे ठप्प असल्याने CBDT ने FY2019-20 मधील रिटर्न फाईल करण्याची तारीख वाढवून दिली आहे. यासह आयकर विभाग Tax Refund वेगाने निकाली काढत आहे. विभागाच्या ट्वीटनुसार, आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये 17 मेपर्यंत विभागाने 15 लाख Taxpayer ला २४,७९२ कोटी रुपये परत केले आहेत. हा IT Refund 1 एप्रिल ते 17 मे 2021 पर्यंत आहे.

- Advertisement -

कसा चेक कराल Income Tax Refund?

१) NSDLवेबसाइटवर जात तेथे पॅन आणि असेसमेंट वर्ष भरा.

२) यानंतर आपल्याला ITR (आयटीआर)बद्दल माहिती मिळेल.

३) किंवा Income Tax विभागाच्या ई-फाइलिंग वेबसाइटवरही तुम्ही पाहू शकता.

४) परंतु या ई-फाईलिंगसाठी तुम्हाला lOG IN करावे लागेल. यानंतर तुम्ही रिटर्न्स/ फार्म्सला सिलेक्ट करा.

५) My Account वर इनकम टॅक्स रिटर्न्स सिलेक्ट केल्यानंतर सबमिट करा.

६) यानंतर एक्नॉलेजमेंट नंबरवर क्लिक करा, आता आपल्या स्क्रिनवर पेज ओपन होईल आणि ज्यातून तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल.


Mucormycosis : ‘म्युकरमायकोसिस’चा साथीच्या आजारात समावेश, केंद्राकडून नवी नियमावली जाहीर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -