घरदेश-विदेश'इंटरपोल' म्हणजे काय रे भाऊ...?

‘इंटरपोल’ म्हणजे काय रे भाऊ…?

Subscribe

इंटरपोलची नोटीस जारी ही बातमी वारंवार आपल्या कानावर पडते. मात्र इंटरपोल ही यंत्रणा नेमकी काय काम करते हे बहुतांश लोकांना माहिती नसतं. जागतिक स्तरावर कार्यरत असणाऱ्या इंटरपोलची माहिती थोडक्यात जाणून घेऊया.

अमूक एका व्यक्तीला इंटरपोलने नोटीस जारी केली, अशा बातम्या आपण सर्रास वाचतो. मात्र हे ‘इंटरपोल’ नेमकं काय प्रकरण आहे, हे फारसं कोणाला माहितं नसतं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील पोलीस सक्षमीकरणासाठी बनवण्यात आलेली यत्रणा एवढीच जुजबी माहिती सरर्वसाधारणपणे लोकांना माहिती असते. नुकतीच नीरव मोदी यांना इंटरपोलने नोटीस जारी केली आहे. यापूर्वीही आर्थिक व्यवहारात मोठा घोटाळा किंवा भ्रष्ट्राचार करून परदेशात पळून जाणाऱ्यांच्या विरोधात इंटरपोल कारवाई करते.

इंटरपोलची सुरूवात 

Interpol_Lione
इंटरपोल मुख्यालय (प्रातिनिधिक चित्र)

१९१४ साली इंटरपोल सारखी यंत्रणा सुरू करण्याचा विचार मोनाको देशातील आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटनेने केला होता. जगभरातील पोलीस यंत्रणेला अधिक सक्षम बनवण्यासाठी जागतिक स्तरावर अशी एक मजबूत यंत्रणा असावी याकरता बनवण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फौजदारी पोलीस संघटनेची स्थापना अधिकृतरित्या १९२३ साली करण्यात आली. तर १९५६ साली इंटरपोल नावाने ही संस्था ओळखली जाऊ लागली. इंटरपोलचे मुख्यालय फ्रांसमधील लिऑन येथे उभारण्यात आले. जगभरातील १९२ देशांची पोलीस यंत्रणा या इंटरपोल संस्थेशी जोडली केली आहे. आंतरराष्ट्रीय तापळीवरील आरोपांविरोधात एकत्रितरित्या लढण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे.

- Advertisement -

या गुन्ह्यांवर इंटरपोलची नजर 

इंटरपोलमध्ये तीन प्रकारच्या गुन्ह्यांची प्रामुख्याने दखल घेतली जाते. यामध्ये पहिले काउंटर दहशतवाद दुसरे सायबर क्राइम तर तिसरे संघटीत गुन्हा यांचा समावेश असतो. गुन्हेगारीपासून लढण्याकरता देशातील सर्व सभासद तसेच आंतरराष्ट्रीय संघटना, संयुक्त राष्ट्र आणि युरोपियन संघासोबत मिळून इंटरपोलची यंत्रणा काम करते. इंटरपोलने जागतिक स्तरावर त्यांची एक पोलीत संचार प्रणाली बनवली असून आय- २४/७ (सूचना २४/७) या नावाने ती ओळखली जाते. यामध्ये कोणत्याही सभासद असलेल्या देशाला सुरक्षितरित्या डाटा मिळवणे तसेच जमा करून देणे याची सोय उपलब्ध असते. इंटरपोलमध्येच Liaison Bureau (LB) या संघटनेचाही समावेश असतो. देशातील मुख्य अधिकारी एलबीच्या माध्यमातून इंटरपोलची सुविधा मिळवू शकतात.

इंटरपोल हे कामं करतं 

terrorism
दहशतवादाशी लढण्यासाठी यंत्रणा

संयुरित्या केलेला गुन्हा, गुन्ह्यांचे नेटवर्क, अनधिकृत व्यवहार यांना संपुष्टात आणण्यासाठी तसेच कमकुवत समुदायाच्या रक्षणासाठी इंटरपोल ही संस्था कार्यरत असते. देशाची सीमारेषा ओलांडून जाणाऱ्या गुन्हेगारांना शोधण्यासाठी, त्यांना अटक करण्यासाठी तसेच मानवी तस्करी थांबवण्याकरता इंटरपोलची मदत घेतली जाते. त्याशिवाय जागतिक स्तरावरील दहशतवादा विरोधात लढण्याचे कार्यही इंटरपोल करते.

- Advertisement -

इंटरपोलच्या वतीने ८ प्रकारचे नोटीस जारी केले जातात. या नोटीस पत्रांचे वैशिष्ट्य म्हणचे सर्वांचे रंग वेगवेगळे असतात

interpol_notice_red_bull_heir_Thailand
इंटरपोल नोटीसचे विविध रंग

लाल रंगाचे नोटीस पत्र आरोपीला अटक करण्यासाठी दिले जाते. मात्र केवळ रेड कॉर्नर नोटीस जारी केलेला व्यक्ती दोषी ठरत नसून त्याच्याविरोधात सबळ पुरावे कोर्टात सादर करावे लागतात.
– तर सुरक्षेचा धोका निर्माण झाल्यास ऑरेंज रंगाचं नोटीस दिलं जातं. ही नोटीस एखाद्या कार्यक्रम, व्यक्ती किंवा वस्तूसंबंधीत दिलं जाऊ शकतं.
– एखाद्या गुन्ह्यामध्ये संशयिताच्या लोकेशनची माहिती मिळवणे, त्याची ओळख पटवणे, त्यांची संपूर्ण माहिती जमा करणे याकरता ब्ल्यू नोटीस जारी केली जाते.
– अज्ञाताच्या मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी तसेच माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक नोटीस जारी केलं जातं.
– सर्वसामान्य व्यक्तीसाठी धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगाराच्या हालचालींसंबंधी ग्रीन नोटीस बजावली जाते. तसेच सराईत गुन्हेगाराकडून त्याच त्याच गुन्ह्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्यासही या रंगाचे नोटीस जारी केले जाते.
– हरवलेल्या लोकांच्या शोधासाठी येल्लो नोटीस जारी केले जाते. प्रामुख्याने अल्पवयीन आणि अपहरण झालेल्या मुलांच्या संदर्भात ही नोटीच बजावली जाते.
– गुन्हेगारांकडून गुन्हे करण्याचे विविध प्रकार, वस्तू, उपकरणं आणि ते लपवण्याचे प्रकार यासंबंधी माहिती जमा करण्यासाठी पर्पल नोटीस जारी केली जाते.
– इंटरपोल – यूए सिक्युरिटी काउन्सिल स्पेशल नोटीसमध्ये नीळ्या रंगाची नोटीस जारी केली जाते.

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -