घरताज्या घडामोडीअजबच! देवी-देवतांनाही नागरिकत्व देण्याची मागणी!

अजबच! देवी-देवतांनाही नागरिकत्व देण्याची मागणी!

Subscribe

सुधारित नागरिकत्व कायदाच्या विरोधात अजूनही लोक रस्त्यावर उतरले आहेत. तर काही लोक या कायद्याला समर्थन करण्यासाठी देखील रस्त्यावर उतरले आहेत. दिल्लीतील शाहीन बाग महिला आंदोलनानंतर आता नागपाडा येथे देखील महिला रस्त्यावर उतरल्या आहेत. एक बाजूला आंदोलन सुरू असताना मात्र दुसऱ्या बाजूला नागरिकत्वाबाबत अजबचं मागणी केली जातं आहे. हैदराबादमधील चिलकूर बालाजी मंदिराचे मुख्य पुजारी रंगराजन यांनी ही अजब मागणी केली आहे. देशात अल्पसंख्याकापेक्षा देवी-देवतांची अवस्था वाईट आहे. म्हणून ते सुधारित नागरिकत्व कायद्या अंतर्गत देवी-देवतांच्या नागरिकत्व मागणी करत असून त्यांनी या कायद्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

राज्य सरकार हे देशभरातील मंदिरांसोबत योग्य नसल्याचं सांगत या पुजाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. याशिवाय सुधारित नागरिकत्व कायद्याच्या अंतर्गत तिरुपती बालाजी, पद्मनाथ स्वामी आणि सबरीमाला यांना नागरिकत्व देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात करण्यार असल्याचं सांगितलं आहे.

- Advertisement -

देशभरातील राज्य सरकारला रंगराजन यांनी विरोध केला आहे. मंदिरात राहणारे देव केवळ मूर्ती नाही आहेत. त्यांना महाराजासारखी वागणूक दिली जाते. त्यांची सकाळी पुजा होते सायंकाळी सांजआरती केली जाते. मात्र सरकारच्या हस्तक्षेपामुळे मंदिरामध्ये पुजा-पाठ व्यवस्थित होत नसल्याचा आरोप रंगराजन यांनी केला आहे. त्यामुळे देवाला नागरिकत्व देण्याची गरज आहे. नागरिकत्व दिल्यामुळे देवाला अधिकार असतील आणि त्या अधिकारांचे रक्षण करता येईल. केमिकल इंजिनियर आणि कायद्याचा अभ्यास करणारे रंगराजन यांनी घटनेच्या विविध भागांवर चर्चा करून हिंदू मंदिरातील मूर्तींना नागरिकत्व देण्याची मागणी केली आहे.


हेही वाचा – एनआरसीच्या भीतीने बंगाल- आसाममधून बांग्लादेशींची पळापळ

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -