घरमनोरंजनअभिनेता सुबोध भावे साकारणार शरद पवार...

अभिनेता सुबोध भावे साकारणार शरद पवार…

Subscribe

अभिनेता सुबोध भावे लोकमान्य टिळक, बालगंधर्व, काशिनाथ घाणेकर या बायोपिकमुळे प्रेक्षकांचा लाडका झाला. या बायोपिकमधील कामांमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं. सध्या सुबोध लवकरच शरद पवारांच्या भुमिकेत दिसणार आहे. अशी चर्चा सुरू आहे. नुकतेच सुबोधने पवारांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. त्यामुळे या चर्चेला सुरूवात झाली आहे. यावेळी सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका साकारायला मला नक्कीच आवडेल, असं तो म्हणाला.

View this post on Instagram

पवारसाहेबांची भूमिका साकारण्याची इच्छा सुबोध भावे यांनी याआधीच व्यक्त केली आहे. सातत्याने व्यक्त होणाऱ्या नेत्यांपेक्षा एक नेता जो योग्य ठिकाणी योग्य वेळ येताच व्यक्त होतो, अशा नेत्याची भूमिका करायला मला नक्कीच आवडेल, असे उद्गार @subodhbhave यांनी काढले आहेत. संवेदनशील व सामाजिकदृष्ट्या सजग भान असलेले अभिनेते, लेखक, दिग्दर्शक व निर्माते सुबोध भावे (@subodhbhave ) यांनी आज आदरणीय खा. शरद पवारसाहेबांची सौजन्य भेट घेतली. @pawarspeaks #maharashtra #sharadpawar #mahavikasaghadi #ncp_maharashtra_updates #king #politics #ncp #subodhbhave

A post shared by Nationalist Congress Party (@ncp_maharashtra_updates) on

- Advertisement -

 

या आधी सुबोधने पवारांची भुमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. शरद पवारांच्या मनात काय चाललय हे तुम्हाला ते कधीच कळू देत नाहीत. हे फार अवघड आहे. शरद पवार ५५ वर्ष राजकारणात आहेत. त्यांच्या एवढं राजकारण आजपर्यंत कोणीच बघितलं नाही. असं सुबोध म्हणाला. त्यामुळे आगामी काळात शरद पवारांच्या जीवनावर आधारित बायोपिक आल्यास त्यांच्या भूमिकेत सुबोध भावेला पाहण्यासाठी चाहते नक्कीच उत्सुक असतील.

View this post on Instagram

सध्याच्या इ-ग्रीटिंग्स, whatsapp आणि फेसबुक च्या जमान्यात आपण एकमेकांवर सणांच्या शुभेच्छांचा वर्षाव करून मोकळे होतो परंतु त्या सणामागचं महत्व, तो सण साजरा करण्यामागचं कारण मात्र कुठेतरी मागे पडतं… म्हणूनच २०२० मध्ये येणाऱ्या पहिल्या सणाची अर्थात मकर संक्रांतीची गोष्ट घेऊन मी येतोय शनिवारी ११ जानेवारी रोजी बरोब्बर सकाळी ०९:०० वाजता… अहो कुठे म्हणून काय विचारताय? आपल्या नेहमीच्या ठिकाणी, "सुबोध भावे" या युट्युब चॅनेल वर… बघायला विसरू नका आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा… आणि तुमच्या लेखणीतून रेखाटलेली अनिमा आणि दम्मा मला अजून पाठवली नसेल तर लवकर पाठवा… किंवा तुमच्या / आई-बाबांच्या इंस्टाग्राम अकाउंट वर #subodhdadachigoshta हा हॅशटॅग वापरून पोस्ट करा… मी ती आवर्जून बघेन… #subodhbhave #youtube #story #marathi #marathistory #newproject #marathiactor #superstar #kids #forkids #storytelling #secondepisode #onair #goodmorning #saturday #firstlove #storytime #creativework #happykids #happynewyear #newyeargreetings #newyear #storysession #everysaturday #launch #webseries #festival #makarsankrant PC : @kshots.rkp

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave) on

- Advertisement -

सध्या सुबोध सध्या ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाच्या प्रयोगांमध्ये व्यग्र आहे. याशिवाय तो ‘AB आणि CD’ या चित्रपटात बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत काम करणार आहे. त्याचबरोबर सुबोध सोशल मीडियावरही खूप अॅक्टीव्ह असतो. सुबोध दादाची गोष्ट या नावाने तो लहान मुलांमध्ये देखील प्रसिध्द आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -