घरदेश-विदेशमाझी मुलगी बलात्कार शब्दाचा अर्थ विचारेल, अशी भीती वाटते - गौतम गंभीर

माझी मुलगी बलात्कार शब्दाचा अर्थ विचारेल, अशी भीती वाटते – गौतम गंभीर

Subscribe

भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर नेहमी स्त्रीयांविषयी संवेदनशील वक्तव्यावरुन चर्चेत असतो. नुकतेच त्याने स्त्रीयांवर होणाऱ्या अत्याचारावरुन एक लेख शेयर केलाय. त्यात त्याने लिहीले की, मला भीती वाटतेय, मला जर माझ्या मुलीने बलात्कार या शब्दाचा अर्थ विचारला तर मी काय उत्तर देऊ?सध्याच्या घडीला घडत असलेल्या घटनांमुळे अगदी बालवाडीत जाणाऱ्या लहान मुलांना सुद्धा वाईट स्पर्श आणि चांगला स्पर्श यातला फरक शिकवावा लागतो. त्यांना बालवयातच या सर्व गोष्टींची जाणीव करुन देणे आता खुप गरजेचे झाले आहे.ज्यावयात त्यांना फुले, रंग, निसर्गाची ओळख करुन द्यायला हवी, त्या वयात त्यांना बलात्कारा सारख्या गोष्टींचा अर्थ किंवा वाईट स्पर्श काय असतो ते सांगावे लागतयं.

- Advertisement -

 

- Advertisement -

 

मला दोन मुली आहेत. एक १० वर्षांची आणि एक ४ वर्षांची. पण मी आणि माझ्या पत्नीने अजूनही आमच्या मुलींना खराब स्पर्श आणि चांगला स्पर्श काय असतो? ते शिकविले नाही. कारण त्यांना या वयात ते सांगावे का? या द्विधा मन:स्थितीत आम्ही आहोत. मुलांना या वयात अशा गोष्टी समजवावे लागणे यापेक्षा पालकांचं दुर्देव आणखी काय असणार.
गौतम असेही म्हणाला की, तो १४ वर्षांचा असतांना त्याला बलात्कार या शब्दाचा अर्थ समजला होता.
इंसाफका तराजू या हिंदी चित्रपटातील दृष्यामुळे मला त्याचा अर्थ कळला होता.
मी शाळेत असतांना माझ्या हातावर बांधल्या जाणाऱ्या राख्यांच्या संख्येवर मला गर्व असायचा. तेव्हाच्या काळी नात्यांमध्ये विश्वास असायचा, आता मात्र लहान मुलांची ओळख आपल्या शेजारी-पाजारी असलेल्या लोकांशी किंवा ड्रायव्हरशी करुन देणे सुद्धा सुरक्षित वाटत नाही. आतापर्यंत लहानमुलांसोबत ज्या काही घटना घडल्या त्या अगदी अंगाचा थरकाप उडिवणाऱ्या होत्या. त्यामुळे लहान मुलांच्या विश्वासर्हतेलाही तडा गेलाय.
गौतम म्हणतोय ज्या धर्मात मुलींचे नवरात्रीमध्ये पूजन केले जाते त्याच धर्मात मुलींचे लैंगिक शोषण कसे करु शकतात.
रिसर्च काय सांगतोय…
गुगल अॅडवर्डच्या रिसर्चनूसार २०१२ निर्भया सामूहिक बलात्कार आणि खून केल्यानंतर, ‘बलात्कार’ या शब्दाचा वापर दरमहा ४.१ दशलक्ष वेळा करण्यात आला होता. अधिक धक्कादायक म्हणजे अलिकडच्या काही आठवड्यात कथुआ सामूहिक बलात्कार पीडिताचे नाव अनेक अश्लील साइट्सवर मोठ्या प्रमाणात शोधले गेलेले शब्द होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -