घरदेश-विदेशमी त्यांना प्रेमाने भेटेन, मिठी मारेन, पण...; वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावरून राहुल...

मी त्यांना प्रेमाने भेटेन, मिठी मारेन, पण…; वरुण गांधींच्या काँग्रेस प्रवेशावरून राहुल गांधींचं मोठं वक्तव्य

Subscribe

Rahul Gandhi on Varun Gandhi Congress Entry | भाजपा खासदार वरुण गांधी सध्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांच्या अनेक विधानांवरुन असं वाटतंय की ते पुन्हा स्वगृही परतील. काँग्रेसमध्ये येण्यासाठी ते आपला मार्गही तयार करत असल्याचंही बोललं जात आहे. भाजपासोबत जाऊन त्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याचं स्पष्ट होत जातंय.

Rahul Gandhi on Varun Gandhi Congress Entry | नवी दिल्ली – भाजपाच्या कार्यपद्धतीवर नाराज असलेले वरुण गांधी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोठं विधान केलं आहे. प्रेमाने मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो. पण त्यांनी स्वीकारलेल्या विचारधारेला मी स्वीकारू शकणार नाही, असं राहुल गांधी म्हणाले. आज भारत जोडो यात्रा पंजाबच्या होशियारपूर येथे पोहोचली आहे. येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

हेही वाचा – काँग्रेसची वाताहत, खर्गेंना पत्र लिहित प्रदेशाध्यक्षांविरुद्ध बंडाचा झेंडा

- Advertisement -

वरुण गांधी काँग्रेसमध्ये येणाच्या वाटेवर आहेत. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राहुल गांधी म्हणाले की, ते भाजपात आहेत. पण, ते येथे आले तर त्यांना अडचण होईल. माझी विचारधारा त्यांच्या विचारधारेशी मिळत नाही. मी आरएसएसच्या ऑफिसमध्ये जाऊ शकत नाही. तिथे जाण्याआधी तुम्हाला माझा गळा कापावा लागेल.

ते पुढे म्हणाले की, माझ्या कुटुंबाची एक विचारधारा आहे. विचार करण्याची पद्धत आहे. वरुण यांनी तेव्हा एक विचारधारा स्वीकारली पण मी त्याला स्वीकारू शकत नाही. प्रेमाने मी त्यांना भेटू शकतो, मिठी मारू शकतो. पण त्या विचारधारेला मी स्वीकारू शकणार नाही.

- Advertisement -

भाजपा खासदार वरुण गांधी सध्या पक्षाच्या कार्यपद्धतीवर नाराज आहेत. त्यांच्या अनेक विधानांवरुन असं वाटतंय की ते पुन्हा स्वगृही परतील. काँग्रेसमध्ये येण्यासाठी ते आपला मार्गही तयार करत असल्याचंही बोललं जात आहे. भाजपासोबत जाऊन त्यांचा अपेक्षाभंग झाला असल्याचं स्पष्ट होत जातंय.


दरम्यान, राहुल गांधी यांना सुरक्षा यंत्रणांना अलर्ट दिला आहे. भारत जोडो यात्रा काश्मीरमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी पायी चालू नये असा सल्ला सुरक्षा यंत्रणांकडून देण्यात आला आहे. काश्मीरमधील काही भागात त्यांनी वाहनांनी यात्रा पूर्ण करावी. तसंच, मोजक्याच लोकांना आपल्यासोबत घ्यावे.

हेही वाचा – भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींना सुरक्षा यंत्रणांकडून अलर्ट, काश्मीरमध्ये पायी चालण्यावर निर्बंध

तसंच, भारत जोडो यात्रेत चालत असताना एक व्यक्ती अचानक त्यांच्याजवळ गेले. त्याने राहुल गांधींना मिठी मारण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडावेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अतिउत्साहाच्या भरात कार्यकर्ते असं वागतात अशी प्रतिक्रिया राहुल गांधी यांनी दिली.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -