घरताज्या घडामोडीICAI CA Results 2022 : सीए फायनल, फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर

ICAI CA Results 2022 : सीए फायनल, फाऊंडेशन परीक्षेचा निकाल जाहीर

Subscribe

सीए फायनल तसेच फाऊंडेशन परीक्षेचा निकाल आज द इंस्टीट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया (ICAI) मार्फत जाहीर करण्यात आला. याआधी सीए फायनल आणि सीए फाऊंडेशन परीक्षा डिसेंबर २०२१ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षेचा निकाल आज १० फेब्रुवारी २०२२ रोजी घोषित करण्यात आला. याआधीच आयसीएआयने ८ फेब्रुवारीला एक नोटीशीद्वारे विद्यार्थ्यांना ईमेल रजिस्ट्रेशन करण्याचे आवाहन केले होते. ICAI चे सीसीएम धीरज खंडेलवाल यांनी निकालाची घोषणा केली. त्यांनी ११ हजार ८६८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. ICAI ने दोन्ही परीक्षांच्या निकालाची मेरिट लिस्टही जाहीर केली आहे. ही मेरिट लिस्ट वेबसाईटवर उपलब्ध आहे. राधिका बेरिवाला या गुजरात राज्यातील सूरतच्या मुलीने या परीक्षेत अव्वल स्थान मिळवले.

सीए फायनल आणि फाऊंडेशन परीक्षांचा निकाल ईमेलवरही मिळणार आहे. एकुण १९२ जिल्ह्यांमध्ये सीए फाऊंडेशन कोर्स न्यू स्कीम परीक्षा १३ डिसेंबर ते १९ डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आली होती. या परीक्षेच्या निकालानंतर सीए मे २०२२ च्या परीक्षेचा निकालही जाहीर केला आहे. ICAI ने आपल्या अधिकृत वेबसाईट icai.org वर मे २०२२ परीक्षेचे वेळापत्रक जाहीर केले आहे. ही परीक्षा वेगवेगळ्या कोर्सेस आणि विषयानुरूप १४ मे ते ३० मे या कालावधीत चालेल.

- Advertisement -

कुठे तपासाल निकाल ?

ज्या उमेदवारांनी सीए डिसेंबर २०२१ ची परीक्षा दिली आहे, अशा विद्यार्थ्यांना खालील लिंकवर निकाल तपासता येईल.

icaiexam.icai.org

- Advertisement -

Caresults.icai.org

icai.nic.in

निकाल कसा डाऊनलोड कराल ?

१. सर्वात आधी ICAI CA च्या अधिकृत संकेतस्थळ icai.org वर व्हिजिट करा
२. ICAI CA परीक्षेच्या निकालावर क्लिक करा
३. आसीएआय सीए नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड टाका
४. आईसीएआय सीए निकाल २०२१ तुमच्या स्क्रीनवर दिले
५. आईसीएआय सीए निकाल कॉपी डाऊनलोड करा


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -