Sunday, May 16, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर RT-PCR चाचणी करणे आवश्यक नाही, ICMRच्या नव्या गाईडलाईन्स

एकदा पॉझिटिव्ह आल्यानंतर RT-PCR चाचणी करणे आवश्यक नाही, ICMRच्या नव्या गाईडलाईन्स

Related Story

- Advertisement -

कोरोना दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातले आहे. दररोज साडे तीन लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळत आहेत. यामुळे आरोग्य व्यवस्थेवर ताण पडला आहे. तर रोज होत असलेल्या मृत्यूच्या संख्येमुळे एक भीतीदायक चित्र दिसून येत आहे. यादरम्यान भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (ICMR) कोरोना चाचणीसंदर्भात नव्या गाईडलाईन्स जारी केल्या आहेत.

काय आहेत ICMRच्या नव्या गाईडलाईन्स?

- Advertisement -

ICMRच्या गाईडलाईनमध्ये असे नमूद केले गेले आहे की, जर एखादा व्यक्ती रॅपिड अँटिजेन चाचणी (RAT) किंवा आरटीपीसीआर (RT-PCR) चाचणी दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला तर पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्याची गरज नाही आहे. तसेच प्रयोगशाळांवर वाढणाऱ्या दबावामुळे जर एखादा निरोगी व्यक्ती एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असेल तर आरटीपीसीआर चाचणी करण्यास सूट मिळू शकते. शिवाय सर्व लक्षणे नसलेले लोकं जर प्रवास करत असतील तर त्यांनी कोरोनाच्या प्रोटोकॉलचे पालन केलेच पाहिजे.

दरम्यान देशात आज २४ तासांत ३ लाख ५७ हजार २२९ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली असून ३ हजार ४४९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ लाख २० हजार २८९ बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता भारतातील कोरोनाबाधितांची संख्या २ कोटी २ लाख ८२ हजार ८३३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत २ लाख २२ हजार ४०८ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी ६६ लाख १३ हजार २९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ३४ हजार ४७ हजार १३३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत १५ कोटी ८९ लाख ३२ हजार ९२१ लसीकरण पार पडले आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Maharashtra Corona Update: लॉकडाऊन इफेक्ट! राज्यात २४ तासांत ६५,९३४ रुग्ण कोरोनामुक्त; ५१,८८० नव्या कोरोनाबाधितांची नोंद


 

- Advertisement -